आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शिरुर:मुलांसोबत खेळली म्हणून मुलीला दारुड्या बापाने केली शिक्षा, मुलीची आत्महत्या

शिरुरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्दयी ‘पित्या’ने ७ तास उभे केले, उपाशीही ठेवले

अवघ्या १२ वर्षांच्या चिमुरडीला गल्लीत समवयस्क मुलांसोबत खेळताना दारुड्या बापाने पाहिले. मुलांसाेबत का खेळत हाेती म्हणून तिला बेदम मारहाण केली. सलग दोन दिवस सात-सात तास उभे राहण्याची शिक्षा केली. उपाशीही ठेवले. बाप बाहेर गेल्यावर तिने स्वत:साठी चहा केला; पण, तो पिण्याआधीच बाप घरी आला अन् त्याने तिला चहाही घेऊ दिला नाही. या अमानुषतेला कंटाळून मुलीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. खोकरमोहा (ता. शिरुर) येथे ही घटना गुरुवारी समोर आली. याला आईने वाचा फोडत पाेलिसांत तक्रार दिली. अमृता ज्ञानेश्वर देशमुख असे मुलीचे नाव आहे.

२२ जून रोजी अमृता तिचा लहान भाऊ आणि नात्यातील इतर मुलांसोबत घरात खेळत होती. दुपारी एक वाजता तिचे आई-वडील बँकेतून परतले. अमृता मुलांसोबत खेळत असल्याचे पाहून तिच्या दारुड्या बापाचा पारा चढला. त्याने तिला मारहाण केली आणि भिंतीच्या कडेला एकाच जागी उभे केले. रात्री आठ वाजेपर्यंत अमृता एकाच जागी उभी होती. रात्री बाप पुन्हा दारू पिऊन घरी आला आणि अमृताला मारण्यासाठी गज काढला, परंतु आईच्या मध्यस्थीने अमृता बचावली. दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरने अमृताला पुन्हा मारहाण केली. एक ते सात वाजेपर्यंत उभे केले. जेवणही दिले नाही. यातून हा प्रकार घडला.

भुकेल्या अमृताची अखेर...

सकाळी भुकेने व्याकूळ अमृताने बाप बाहेर गेल्यानंतर चहा केला. बिस्कीट खात असताना बाप आला. त्याने तिला चहा घेऊ दिला नाही. तो पुन्हा बाहेर गेल्यानंतर मायलेकींनी स्वयंपाक केला. पण बापाने जेऊ दिले नाही. अखेर तिने जीवन संपवले.

0