आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्याशी मैत्री कर, नाही तर कोयत्याशी गाठ!:मुलाच्या धमकीने अल्पवयीन मुलगी त्रस्त; हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्याशी मैत्री कर नाही तर कोयत्याशी गाठ पडेल, असे सांगत एका 17 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय मुलीशी मैत्री करण्यासाठी अजब अट्टहास धरला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर तिला मैत्री न केल्यास ठार मारण्याचीही धमकी दिली. या प्रकाराने मुलगी गांगारून गेली असून तिने लगेचच हा प्रकार कुटुंबियांना सांगून पोलिस ठाण्यात धाव घेतली. सदरील हा प्रकार हडपसर परिसरात घडला आहे.

काय आहे प्रकार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलगी 8/11/2022 रोजी क्लासला गेली असताना, ती पुन्हा क्लासवरुन परतातना संबंधित आराेपी मुलगा तिच्याजवळ आला त्याने माझ्याशी मैत्री करशील का’ असे बाेलुन तिचा पाठलाग केला. तसेच मागील 15 दिवसांपूर्वी तिला आडवून काेयता दाखवून मैत्री कर नाहीतर तुला जिवंत मारेल अशी धमकी दिली होती. परंतु मलीने घाबरुन हा प्रकार घरी सांगितला नव्हता. अखेर तीने ही बाब पालकांना सांगितल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पयीन मुलावर याप्रकरणी विनयभंग, धमकावणे तसेच पॉक्सोच्या विविध कलमुनसार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुढील तपास हडपसर पोलिस करत आहे.

वीज कनेक्शनच्या बहाण्याने फसवणूक

नवीन वीज मीटर कनेक्शन देण्यासाठी चार जणांकडून तब्बल 46 हजार रूपये स्विकारून कोणतेही वीज कनेक्शन न देणार्‍या एकावर कोंढवा पोलिस ठाण्यात इलेक्ट्रीशनवर न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला आहे. नितीन रमेश नाईक (रा. महात्मा फुले पेठ, स्वारगेट, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत रजाक इसाक सय्यद (57, रा. रा. मोहमंदी हाईट्स, भाग्योदयनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 1 मार्च 2022 ते 8 नोव्हेंबर 2022 दरम्यान घडला.

गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन नाईक हा इलेक्ट्रीशनची कामे करतो त्याने फिर्यादी रजाक सय्यद, मुनीरा खान, रशीदा महीदा, अबु शेख यांना नवीन वीज मीटर कनेक्शन काढून देण्यासाठी त्यांच्याकडून 46 हजार 300 रुपये स्वीकारले परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचे मीटरचे वीज कनेक्शन दिले नाही. तसेच त्यांच्याकडून घेतलेली रक्कम मागणी करूनही परत दिली नाही. त्यामुळे आता न्यायालयाच्या आदेशानुसार नाईकवर फसवणूक तसेच रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बाबर करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...