आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ:स्वातंत्र्य समराचा तेजस्वी कालखंड उलगडणारे महानाट्य 18 जूनला होणार पुण्यात; प्रवेश विनामूल्य

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण प्रसारक मंडळ आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोह समिती, पुणे यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि चापेकर बंधूच्या पराक्रमाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त ‘स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ’ या महानाट्याचे आयोजन शनिवारी 18 जून रोजी पुण्यात करण्यात आले आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होईल, अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे यांनी दिली.

25 वर्षांनंतर होणार प्रयोग

वंजारवाडकर म्हणाले की, चापेकर बंधूंनी केलेल्या रॅंड वधाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 1997 मध्ये या महानाट्याचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी चापेकर बंधूंच्या पराक्रमावर भर देण्यात आला. 25 वर्षांनंतर हा प्रयोग नव्या स्वरूपात सादर होत असून त्यात चापेकर बंधूंबरोबरच त्यांच्या आधीच्या व नंतरच्या क्रांतिकारकांच्या कार्यावरही प्रकाश टाकण्यात येईल. त्यात लहुजी साळवे, बिरसा मुंडा, उमाजी नाईक आणि अगदी झाशीची राणी तसेच लोकमान्य टिळक व स्वामी विवेकानंद यांचेही दर्शन रंगमंचावर होईल. भारतातील 1857 पासूनच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांची माहिती नवीन पिढीला व्हावी, हा यामागचा हेतू आहे.

प्रवेश विनामूल्य

चितळे म्हणाले की, तरुण पिढीपुढे हा इतिहास जावा हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण प्रसारक मंडळीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोह समितीच्या विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. इतिहास प्रेमी मंडळ संस्थेच्या वतीने सादर होणाऱ्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन मोहन शेटे यांनी केले आहे तर वैशाली इनामदार आणि अभिषेक शाळू हे सहाय्यक दिग्दर्शक आहेत. सुमारे 125 कलावंत, भव्य रंगमंच, नृत्य व संगीत आणि प्रत्यक्ष घटनेची जिवंत मांडणी यात अनुभवायला मिळेल. दोन तासांच्या या महानाट्यासाठी प्रवेश विनामूल्य असेल .

हे साकारणार भूमिका

शेटे म्हणाले की लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत अ‌ॅड. अभिजीत देशमुख असतील तर दामोदर चापेकरांच्या भूमिकेत भूषण पाठक असतील. कुणाल कांबळे बाळकृष्ण चापेकरांची भूमिका करणार आहेत. जयंत डोंगरे वासुदेव फडके यांच्या, कोमल राजपाठक झाशीच्या राणीच्या, राहुल क्षीरसागर लहुजी वस्तादांच्या, आशुतोष तपसाळे उमाजी नाईकांच्या, शौनक कंकाळ हे स्वामी विवेकानंदांच्या भूमिकेत असतील.

बातम्या आणखी आहेत...