आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामीनदाराच्या आत्महत्या प्रकरणी कर्जदाराला बेड्या:कर्जदाराने हप्ते न भरल्याच्या त्रासामुळे जामीनदाराने उचलले होते टोकाचे पाऊल

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोटारीसाठी कर्ज घेतल्यानंतर हप्ते परतफेड न केल्यामुळे बँकेने जामीनदार मित्राला समन्स पाठविले. त्यामुळे खटल्याचे समन्स आणि कर्जदार मित्र हप्ते जमा करत नसल्याच्या छळाला कंटाळून तरूणाने आत्महत्या केली. याप्रकरणी फरार झालेल्या कर्जदार मित्राला युनीट एकने शुक्रवारी अटक केली आहे.

किरण नवनाथ भातलांवडे (वय 40 रा. गवळी वस्ती, मांजरी बुद्रुक,पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. राजेंद्र ऊर्फ राजु रामचंद्र राऊत (रा. घोरपडे पेठ,पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आरोपी किरण भातलांवडे याने मोटारीसाठी बँकेकडून कर्ज घेताना जामिनदार म्हणून राजेंद्र राऊत यांच्या सह्या घेतल्या होत्या.

काही महिन्यांनी किरणने मोटारीचे हप्ते जमा न केल्यामुळे बँकेने राजेंद्रला नोटीस पाठविली. त्यामुळे दोघांत वाद झाल्यामुळे त्याला मानसिक त्रास झाला. बँकेने दोघांविरूद्ध न्यायालयात खटला दाखल केला. वारंवार कोर्टाचे समन्स घेवुन पोलिस घरी येत असल्याने आणि कर्जदार मित्र बँकेत पैसे भरत नसल्याने राजेंद्रने आत्महत्या केली.

फरार किरण हा मांजरी परिसरात मित्राला भेटायला येणार असल्याची माहिती पोलीस अमलदार शुभम देसाई, नीलेश साबळे यांना मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, एपीआय आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, निलेश साबळे, शुभम देसाई, महेश बामगुडे यांनी केली.

अडीच लाखांचा ऐवज लांबविला

सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना पुण्यातील हडपसर भागात घडली.प्रमोद हरपळे (वय 33 रा. भोई आळी, फुरसुंगी, हडपसर) यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरपळे फुरसुंगीतील भोई आळी परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलुप तोडून कपाटातील एक लाख 10 हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा दोन लाख 44 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबविला. उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...