आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्क सक्तीवरून संभ्रम:आरोग्य सचिव म्हणतायेत, मास्क बंधनकारक; तर आरोग्यमंत्री टोपे म्हणतात, सक्ती नव्हे फक्त आवाहन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सरकार आणि प्रशासनामधील असमन्वय आणि गोंधळ समोर आला आहे. एकीकडे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवाने राज्यात मास्क सक्ती असल्याचे पत्रक काढले आहे, तर दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कसलीही मास्क सक्ती नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा गोंधळ कोरोनाच्या दोन लाटेनंतर तरी कमी होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.

शुक्रवारी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली आहे. रुग्णालय, महाविद्यालय, कॉलेज, शाळा, रेल्वे, बस, सिनेमागृह आणि सभागृहात ही सक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याच्या आदेशांसह अन्य काही आदेश जारी केले आहेत.

आढावा घेऊन निर्णय

आरोग्य विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रावर राजेश टोपे यांनी अधिकची माहिती दिली आहे. "राज्यात अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाही. केवळ कोरोना रुग्णसंख्या वाढू नये म्हणून, मास्क वापरण्याबाबत जागृती करण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहे. कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असून लसीकरण वाढवा, टेस्टींग वाढवा, व्हेरिएंट तपासणी करा, मास्क वापर वाढवा अशा सूचना केंद्रीय आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहे. मास्क संर्दभात सक्ती करावयाची की नाही याबाबत 15 ते 20 दिवसानंतर आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल. राज्यात रुग्णसंख्या ठराविक भागात वाढत असली तरी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गंभीर परिस्थिती अद्याप उदभवलेली नाही", असे टोपे म्हणाले.

दंड लागणार नाही

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे सांगण्यात आले असले तरी, या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात येणार नाही. यापूर्वी कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड भरावा लागत होता.

पत्रात काय म्हटले?

राज्याच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार सूचना देऊनही राज्यातील चाचण्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. 1 जूनच्या आकडेवारीनुसार, 26 जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक चाचण्यांच्या संख्येत मोठी कमतरता आहे. ही चिंतेची बाब असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण चाचण्यांचे प्रमाण तत्काळ वाढवावे, असे पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...