आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन नको कृती हवी:जोपर्यंत कामगारांना कामावर घेणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील- कामगार नेते यशवंत भोसलेंचा इशारा

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामगार हा बाजारपेठेतील प्रमुख ग्राहक आहे. त्याच्याच हाती पैसे राहिले नाहीत, तर भारताची अर्थव्यवस्था ढासळेल. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात शिंदे सरकारने कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडावी व कामावरून काढलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश देण्यात यावे. जोपर्यंत या 270 कामगारांना कामावर घेणार नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंत भोसले यांनी केली.

केंद्र सरकारच्या कामगार कायद्याच्या नवीन धोरणाविरोधात तसेच कोरोना काळात नोकरी वरून काढलेल्या कामगारांना पुन्हा कामावर परत घ्यावे, यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंत भोसले हे गेल्या सहा दिवसांपासून कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे प्राणांतिक उपोषणाला बसले आहे.

आज या कामगार उपोषणा ठिकाणी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बुधाजिराव मुळीक यांनी येवून भोसले यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. तसेच नवनियुक्त कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याशी देखील चर्चा झाली. मात्र, आता आश्वासन नको कृती हवी असे म्हणत यशवंत भोसले हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

यावेळी यशवंत भोसले म्हणाले की, केंद्रातील नवीन कामगार कायदे महाराष्ट्रात लागू झाले तर फिक्स टर्म एम्प्लयमेंट या नवीन कायद्यामुळे 5 व 3 वर्षांकरिताच विविध कंपनी व विविध उद्योग समूहात युवकांना नोकरी मिळणार आहे, पुढे कायम कामगार पद्धत बंद होईल. कामगार कायद्याचे संरक्षण निघून गेल्यास भविष्यात देशातील युवा पिढीची प्रचंड पिळवणूक होणार तर आहेच, परंतु आताचे कामगारांचे भविष्य धोक्यात येईल.

जानेवारी 2023 ला संभाव्य नवीन कामगार कायदे महाराष्ट्रात लागू झाले, तर त्याची झळ संपूर्ण राज्यातील श्रमिक व नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या असंख्य तरुणांना पडणार आहे. कामगार मुख्य ग्राहक आहे, बाजारपेठेचा पैसे त्याच्याच हाती राहिले नाही तर भारताची अर्थव्यवस्था ढासळेल. छोटे व्यावसाय बंद पडतील. त्यामुळे किमान व्यावसाईकांनी तरी या कामगार कायद्याला विरोध करावा अशी मागणी, यशवंत भोसले यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...