आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझारखंडमधील पारसनाथ येथे असलेल्या जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरबाबत केंद्र सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. याच निर्णयाप्रमाणे आणखी एक जैन समाजाचे पवित्र स्थान असलेल्या गुजरातमधील पलीताना तीर्थ आणि गिरनार तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले आहे, त्यांचे संरक्षण व्हावे व जैन समाजाच्या मुनींवर होणार्या हल्याबाबत योग्य निर्यण घ्यावा अशी मागणी सकल जैन समाजाकडून करण्यात येत आहे असे मत राष्ट्रीय पार्श्व भैरव भक्त परिवार संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोदराज सांकला आणि नितीन अग्रवाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
सांकला म्हणाले, जैन धर्मीयांचे सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी येथील परिसरात पर्यटनाचा विकास करण्यासाठी सुरू असलेल्या सर्व हालचाली थांबविण्याचा स्वागतार्ह निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पर्यटन विकासाला कोणीही विरोध करणार नाही. पण ते करताना कोणत्याही समुदायाची श्रद्धा, धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे केंद्रा सरकाराकडून जैन समाजाची ही मागणी त्याच प्रमाणे आणखी एक पवित्र स्थान असलेल्या गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील मंदिरात काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला. या परिसरात झालेली तोडफोड आणि सुरु असलेले उत्खनन तत्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी जैन समाजाकडून करण्यात येत आहे. तसेच पलीताना येथे चाललेल्या उत्खनन, ठिकाणी सुरु असलेली अवैध मद्यविक्री बंद व्हावी, ही देखील मागणी केली जात आहे.
तसेच गुजरातमधील गिरनार तीर्थ क्षेत्र आहे. श्री गिरनार महातीर्थवर अनेक वर्षापासून असामाजिक तत्वांकडून अतिक्रमण व विकास / पर्यटन स्थळाच्या नावाखाली अधीन करण्याचे षड्यंत्र देशात सुरु असून ते बंद व्हावे व जैन समाजाचे तीर्थ क्षेत्राला जैन तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे आणि तीर्थ क्षेत्राच्या आजुबाजूच्या 50 कि.मी. क्षेत्रात मास-मदिरा विक्री बंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच स्थानिक गुंडाकडून अवैध रित्या कब्जा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जैन समाजाच्या लोकांना धमकाविले जात आहे. याकडेही लक्ष केंद्रीत करून उपाय योजना करावी अशी मागणी आहे. याच सोबत जैन समाजाचे मुनी, साधु, साध्वी यांच्यावर जीवघेणे हमले होत आहे. त्यांना सुरक्षितता मिळावी अशी ही मागणी जैन समाजाची आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.