आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • The King Of Fruits Left For Japan, America; State of the art Vapor Heat Treatment Facility From Agriculture Marketing Board Including Saffron

फळांचा राजा निघाला जपान, अमेरिकेला:केशरचा समावेश, कृषी पणन मंडळाकडून अत्याधुनिक व्हेपर हीट ट्रीटमेंट सुविधा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फळांच्या राजाचा आंबा हंगाम सुरू झाला आहे. राज्यात उत्पादित होणाऱ्या आंब्याला विकसित देशांची बाजारपेठ उपलब्ध होण्याकरिता आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने उपलब्ध करून दिल्या आहेत. या हंगामातील आंब्याची जपानची पहिली कन्साइनमेंट महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील व्हेपर हीट ट्रीटमेंट सुविधेवरून रवाना करण्यात आली. यामध्ये केशर व बैगनपल्ली असा १.१ मेट्रिक टन आंबा जपान येथे निर्यात करण्यात आला.

जपान या आयातदार देशाच्या निकषान्वये निर्यातीपूर्वी आंब्यावर व्हेपर हीट ट्रिटमेंट प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. कृषी पणन मंडळाच्या अद्ययावत व्हेपर हीट ट्रीटमेंट सुविधेमुळे हे शक्य झाले आहे. जपानची बाजारपेठ इतर देशांच्या तुलनेने वेगळी असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जपानमध्ये आपला आंबा केवळ भारतीयच नाही तर जपानी ग्राहकदेखील आवडीने खातात.

निर्यातीसाठी आवश्यक सर्व सुविधा कृषी पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज करण्यात आल्या आहेत. २०१९ पर्यंत जपानी निरीक्षकाच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये व्हेपर हीट ट्रीटमेंट प्रक्रिया करून प्रक्रिया प्रमाणित केल्यानंतरच आंब्याची जपानला निर्यात होत होती. २०२० व २०२१ मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जपानचे इन्स्पेक्टर भारतात येऊ शकले नाहीत. २०२२ पासून जपानने त्यांचे निरीक्षक न पाठवता केंद्र शासनाच्या एनपीपीओ विभागाच्या निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पार पडते.

-अशी होते आंब्यावर प्रक्रिया ‘मॅगोनेट’मध्ये नोंदणीकृत बागेवरील आंबा क्रेटमध्ये सुविधेवर येतो. आंब्यावर होणाऱ्या फळमाशीचा (फ्रूट फ्लाय) होणारा प्रादुर्भाव नष्ट होण्यासाठी सुविधेवर आंब्याची व्हीएचटी प्रक्रियेअंतर्गत प्रथम ग्रेडिंग केले जाते. मग प्लास्टिकच्या क्रेट्समध्ये एका थरामध्ये रचून ते क्रेट्स मशीनमध्ये ठेवले जातात. टप्प्याटप्प्याने आंब्याच्या गराचे तापमान वाढवून ४७.५ डिग्री सें.ग्रे. तापमान नियंत्रित केले जाते. ---------------