आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिबट्याची सुटका:विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याची भाजीच्या कॅरेटमधून सुटका

पुणे9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे नाशिक रस्त्यावर आळेफाटा येथे मौजे पिंपळवंडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याची चक्क भाजीच्या कॅरेटमधून सुटका करण्यात आली.

येथील चाळकवाडीतील सुनील सोनवणे यांच्या विहिरीत काल एक बिबट्याचा बछडा पडला. विहीर खोल असल्याने बछड्याला बाहेर पडणे अशक्य झाले. तो गुरगुरू लागला. त्यामुळे विहिरीत बिबट्या पडल्याचे लक्षात आले.  त्वरित वनविभागाशी संपर्क साधण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याच्या बछड्याची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टीमने प्रयत्न सुरू केले. वनपाल एस के साळुंखे,  वनरक्षक विभुते यांनी विहिरीची पाहणी केली. शेवटी थोडा धोका पत्करून भाजी ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा कॅरेट दोरीला बांधून विहिरीत सोडण्यात आला. बिबट्याच्या बछड्याने लगेच कॅरेटमध्ये उडी मारली. त्याला सावकाश वर खेचण्यात आले. काठावर येताच बछड्याने बाजूच्या उसाच्या शेतात धूम ठोकली. काही वेळाने मादी बिबट्याचेही दर्शन ग्रामस्थांना घडले.

बातम्या आणखी आहेत...