आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकीचे दर्शन:वाट चुकलेली “ती’ महिला सुखरूपरीत्या घरी परतली

देवळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेमुळे वाट चुकलेल्या तरुण महिलेला सुखरूपपणे तिच्या कुटुंबात रवाना केल्याने खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडले. तक्रार नसतानाही पोलिसांनी यात लक्ष घातल्याने ही महिला सुखरूप घरी पोहोचली आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी नगरपंचायतीजवळील दुकानात एक महिला चहा मागत असल्याचे आणि ती थोडीशी मानसिकदृष्ट्या खचलेली असल्याचे लक्षात आल्याने गोकुळ देवरे यांनी पोलिसांना कळवले. पंजाबी ड्रेस, व्यवस्थित बोलणे यामुळे ती वाट चुकलेली व चांगल्या घरची असल्याने तिचा तपास करायला हवा, अशा सूचना पोनि दिलीप लांडगे यांनी दिल्या.

मात्र यादरम्यान ती परिसरात न दिसली नाही.सपोनि पुरुषोत्तम शिरसाठ, फौजदार विक्रांत कचरे, हवालदार रामदास गवळी, महिला पोलिस ज्योती गोसावी, छाया गांगुर्डे आदींनी तिचा शोध घेतला असता ती शहराच्या एका बाजूस आढळली. तिला पोलिस चौकीत आणून विचारपूस केल्यावर ती नामपूरची असल्याचे तिने सांगितले. जायखेड्याचे सपोनि श्रीकृष्ण पारधी यांच्यामार्फत कुंटुंबीयांशी संपर्क साधून तिचा कुटुंबीयांकडे ताबा दिला.

बातम्या आणखी आहेत...