आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारच्या 80 तरुणांना भामटयाचा गंडा:कंपनीत नोकरीचे दाखवले आमिष; बनावट सही शिक्का वापरुन वाटले जॉइनिंग ऑफर लेटर

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे अहमदनगर रस्त्यावरील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील हायर अपलायंनसेंस (इंडिया) प्रा. लि. या कंपनीत कामाला लावण्याच्या नावाखाली बिहार येथील भागलपूर या ठिकाणी आयटीआय मध्ये शिक्षण घेत असलेल्या 80 विद्यार्थ्यांना कंपनीच्या नावाने बनावट सही शिक्का वापरुन नोकरीचे बनावट जॉइनिंग ऑफर लेटर दिले. शिवाय, त्यांच्याकडून पैसे घेऊन आर्थिक फसवणुक करत गंडविणाऱ्या दोन भामट्यांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत कंपनीचे एच. आर. एडमिन मॅनेजर प्रणय धुमाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी तीन युवक हायर अपलायंनसेंस (इंडिया) प्रा. लि. या कंपनीच्या गेटवर आले. त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडे असलेले जॉइनिंग ऑफर लेटर कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला दाखवले. परंतु, त्याला त्या जॉयनिंग लेटरबाबत शंका आल्याने त्याने ते लेटर एच. आर. मॅनेजर अंकलेश महाले आणि एच. आर. एडमिन मॅनेजर प्रणय धुमाळ यांना दाखवले. सदरच्या "ऑफर लेटरवरती" हायर कंपनीचे नाव व शिक्का वापरुन बनावट "जॉईनिंग ऑफर लेटर" कोणीतरी तयार करुन मुलांना दिले असून त्यांची फसवणुक केली असल्याचे या दोघांच्या निदर्शनास आले.

याबाबत तीन युवकांकडे अधिक चौकशी केली असता. त्यांनी सांगितले की, 'आमच्या बिहार येथील भागलपूर येथील आयटीआय कॉलेजमध्ये 5 जून रोजी राहुल गौतम गरामी आणि सुमन तितास मंडल हे दोघे (रा. जमालपुर, पश्चिम बंगाल) हे आले होते. त्यांनी आमच्या कॉलेजमधील शिक्षकांना हायर कंपनी, पुणे येथून आलो असल्याचे सांगितले.

आमच्या आयटीआय मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेवून त्यापैकी 80 विद्यार्थ्यांची निवड केली. त्यांना हायर कंपणीचे (ता. 16) रोजी जॉईनिंगचे ऑफर लेटर दिले आहे. शिवाय, प्रत्येक विद्यार्थाकडून 5 हजार प्रमाणे एकूण 4 लाख रुपये विद्यार्थ्यांना हायर कंपनीच्या नावाने बनावट सही शिक्के वापरुन "जॉईनिंग ऑफर लेटर" दिल्याचे सांगितले. त्यामुळे कंपनीचे वतीने प्रणय धुमाळ यांनी तात्काळ रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत फिर्याद दाखल केली.

बातम्या आणखी आहेत...