आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंतवैद्यांसाठी इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीची स्थापना:तज्ज्ञ दंतवैद्यकांना एकत्रितपणे काम करता यावे हा मुख्य उद्देश

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल क्रांतीमुळे जग दिवसेंदिवस झपाट्याने बदलत आहे. दंतवैद्यक क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान लक्षणीय बदल घडवून आणत आहे. असे असताना तंत्रज्ञानाधारित उपचार करणाऱ्या तज्ज्ञ दंतवैद्यकांना एकत्रितपणे काम करता यावे, या उद्देशाने इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्री (आयएसडीडी) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. पंकज चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तंत्रज्ञानाच्या अविष्कारामुळे श्रमकेंद्री व्यवस्था सोपी, जलद, परवडणारी आणि विश्वासार्ह बनत आहे. अत्याधुनिक मशिनरी, विविध प्रगत संगणक प्रणाली, थ्रीडी प्रिंटिंग, स्कॅनिंग, रोबोटिक आदींचा उपयोग करून उपचार करणे शक्य झाले आहे. इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीच्या अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. चिवटे पुण्यातील डिजिटल डेन्टिस्ट्रीमधील तज्ज्ञ आहेत. सचिवपदी ओरल इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. रत्नदीप जाधव, तर खजिनदारपदी डेंटल इम्प्लांट्स अँड कॅड-कॅम डेन्टिस्ट्री तज्ज्ञ डॉ. विजय ताम्हाणे, सहसचिवपदी डॉ. केतकी असनानी, सह खजिनदारपदी डॉ. कौस्तुभ पाटील, वैज्ञानिक संचालकपदी डॉ. संजय असनानी, शिक्षण संचालकपदी डॉ. सुरेश लुधवानी यांची निवड झाली आहे.

डॉ. रत्नदीप जाधव म्हणाले, दंतवैद्यक शास्त्रात होत असलेली डिजिटल क्रांती लक्षात घेता अशा असोसिएशनची गरज असल्याचे आम्हाला जाणवले. त्यातून सात डॉक्टरांनी एकत्र येत फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनी अ‍ॅक्ट अंतर्गत या संस्थेची स्थापना केली. अचूक, जलद आणि विश्वसनीय उपचार डिजिटल उपकरणांच्या वापराने शक्य होत आहे. भविष्यात दंतवैद्यक शास्त्र अधिक तंत्रज्ञानाधारित होणार आहे. त्यामुळे दंतवैद्यक आणि दंतवैद्यक शास्त्राचे विद्यार्थी यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने, तसेच जगभरातील नाविन्यपूर्ण, डिजिटल डेन्टिस्ट्रीचा प्रचार व प्रसार करून अत्याधुनिक उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांना व डॉक्टरांना एकत्र आणण्याचे काम असोसिएशन करणार आहे.

जगभरातील डिजिटल डेन्टिस्ट्रीमध्ये कार्यरत असणाऱ्या दंतवैद्यक यांची एक आंतरराष्ट्रीय परिषद पुण्यामध्ये घेतली जाणार आहे. इटली येथील कम्प्युटर एडेड इम्प्लांटॉलॉजी अकॅडमी (सीएआय, इटली) आणि ऑस्ट्रिया येथील इंटरनॅशनल अकॅडमी फॉर अल्ट्रासॉनिक सर्जरी अँड इम्प्लांटॉलॉजी (आयएयुएसआय, ऑस्ट्रिया) या दोन संस्थांनी शैक्षणिक सहकार्यासाठी सहयोग दिला आहे. त्यातून या क्षेत्रातील नवीन संशोधने, नवकल्पना व तंत्रज्ञान याचे आदानप्रदान होईल असे डॉ. विजय ताम्हाणे यांनी नमूद केले

बातम्या आणखी आहेत...