आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मध्यरात्री रंगणार मॅरेथॉन:स्पर्धेला 3 डिसेंबरला सुरुवात; ​100 हून अधिक धावपटूंचा असणार सहभाग

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर नेणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे यंदाचे 36 वे वर्ष आहे. रविवारी (4 डिसेंबरला) ही मॅरेथॉन असणार आहे. याही वर्षी ‘नाईट मॅरेथॉन’ म्हणून संपन्न होईल. या स्पर्धेचा प्रारंभ (3 डिसेंबरला) रात्री 12 नंतर व (4 डिसेंबर 00:01 वाजता) होईल.

नाईट मॅरेथॉनमध्ये महिला– पुरुषांचे प्रत्येकी 6 गट आहेत. पुरुष व महिला 42..195 कि.मी.ची पूर्ण मॅरॅथॉन, पुरुष व महिलांच्या साठी अर्ध मॅरॅथॉन (21.0975 किमी) या शिवाय या दोन्ही विभागांसाठी 10 कि.मी.,5 कि.मी. , व्हीलचेअर (3 किमी) आणि फॅमिली रन (3 किमी) असे अन्य गट आहेत.

या लिंकद्वारे करा नोंदणी

यंदाच्या मॅरेथॉनचे वैशिष्ठ म्हणजे यावर्षी (सप्टेंबर 2022) लडाख मध्ये झालेल्या 'सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 2022' मधील पूर्ण मॅरेथॉनचे पुरुष गटातील विजेते जीग्मेट नामग्याल आणि पूर्ण मॅरेथॉन महिला गटातील विजेती डीक्सेट डोल्मा हे पुण्याच्या ‘नाईट मॅरेथॉन’ मध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची नावनोंदणी ऑनलाईन पद्धतीने www.marathonpune.com येथे सुरु झालेली आहे.

असा असेल मार्ग

या स्पर्धेत भाग घेतलेल्या धावपटूंनी नोंदविलेल्या वेळेनुसार त्यांना विशिष्ट गुण (पॉइंटस) देण्यात येतील आणि पुढील वर्षी अमेरिकेतील शिकागो येथे होणाऱ्या WANDA WORLD CHAMPIONSHIPS MARATHON मध्ये प्रवेशासाठी या गुणांचा विचार केला जाईल. आणि त्याप्रमाणे वरील शिकागो स्पर्धेत सहभागी होणे साठी त्यांना सुलभता प्राप्त होईल.तसा आंतरराष्ट्रीय करार उभयातांमध्ये ( पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आणि वांडा वर्ल्ड चॅम्पियनशिपस मॅरेथॉन, शिकागो ) करण्यात आला आहे. सणस मैदान येथून पुरुष आणि महिला 42.195 कि.मी.ची पूर्ण मॅरेथॉन सुरु होऊन सारसबाग–सिंहगड मार्ग - नांदेड सिटी-नांदेड सिटीमधील आतील सर्कलला वळसा घालून पुन्हा सिंहगड मार्गावरून-सारसबाग –सणस मैदान ही पहिली फेरी व पुन्हा त्याच मार्गाने जाऊन त्याच मार्गाने परत सणस मैदान येथे पूर्ण मॅरॅथॉन ( 42.195 किमी) संपेल.

रोहन मोरेंची महिती

मागीलवर्षी पहिल्यांदाच पुण्यात ‘नाईट मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली होती. या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये 15 हजार हून अधिक स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा असून दरवर्षी प्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे परदेशी पुरुष व महिला धावपटू यात सहभागी होतील, 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावपटूंनी पुण्याचा ‘नाईट मॅरॅथॉन’ मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्कही साधला आहे. अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय मरेथॉन ट्रस्टचे ट्रस्टी ॲड. अभय छाजेड आणि जॉइंट रेस डायरेक्टर व ट्रस्टी रोहन मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बातम्या आणखी आहेत...