आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभरदिवसा प्रेम प्रकरणातून तरुणीचा तिच्या आईच्या समोरच सपासप वार करून खून करून नंतर स्वतः आरोपीने आत्महत्या केल्याचा धककदायक प्रकार पुण्यातील औंध परिसरात घडला होता. या घटनेतील दोघा संशयितांना पुणे जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती ॲड. मिलिंद पवार यांनी मंगळवारी दिली.
श्वेताने नकार दिल्याने केला खून
चार्टर्ड अकाऊंट असलेली तरुणी श्वेता रानवडे (वय-22 रा. औंध )असे खून झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचे नाव आहे. श्वेताचे नात्यातील प्रतीक किसन ढमाले (वय 27 ) याच्या सोबत प्रेमसंबंध होते. दोघेजण लग्नही करणार होते. परंतु प्रतिकची वर्तणूक योग्य नसल्याने श्वेताने प्रतिक सोबत असलेले संबंध तोडले होते.
चाकून सपासप केले वार
9 नोव्हेंबरला दुपारी एक वाजता श्वेता व तिची आई सोसायटीच्या पार्किंगमध्ये आल्या. पार्किंगला गाडी लावण्यासाठी तीची आई खाली उतरली श्वेता गाडीवरच बसून होती, अचानक प्रतीक ढमाले हा दुचाकीवरून श्वेताच्या व तिच्या आईच्या जवळ आला. प्रतीकने चाकूने श्वेताच्या पोटात, छातीत, हातावर सपासप वार केल्याचा प्रकार घडला होता. हे सगळ झाल्याने प्रतिकने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली होती. व त्याच्या दुचाकीवरून पळुन गेला. नंतर मुळशीला प्रतिकेने आत्महत्या केली त्यात प्रतिकचा मृत्यू झाला. प्रतिकच्या हल्ल्यामध्ये मध्ये श्वेता गंभीर जखमी झाल्याने तिची मृत्यू झाला होता.
प्रतिकचे वडिल किसन ढमाले (वय 50) व प्रतिक्षा मित्र रोहित यशवंत डावरे( वय 27 )यांनी पुणे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. आरोपींच्या वतीने ॲड मिलिंद द.पवार व ॲड सुधीर शहा यांनी युक्तिवाद केला. प्रतिकने श्वेतावर पुण्यात औध येथे हल्ला केला तेव्हा रोहित डावरे हा कामानिमित्त गुवाहाटी येथे होता, तसेच ढमाले हे वकील असून मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. रोहित डावरे व किसन ढमाले दोघेही घटनास्थळी नव्हते. या घटनेत मुख्य आरोपी प्रतिक किसन ढमाले हा होता व त्यानेच आत्महत्या केली आहे. दोघेही पुढील तपासासाठी पोलिसांना सहकार्य करतील हा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षाराणी पत्रावळे यांनी दोन्ही आरोपींना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.