आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोयत्याने हल्ला:नववर्षाच्या मध्यरात्री तरुणाचा खून; चार संशयित अटकेत

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नववर्षाच्या मध्यरात्री वारजे माळवाडी भागात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. वारजे पोलिसांनी तातडीने तपास करून चार संशयितांना अटक केली.

भूमीपूत्र युवराज कांबळे (२३, रा. वारजे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत कांबळे याचा भाऊ वीरफकीरा याने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे आणि त्याचा मित्र मध्यरात्री वारजे भागातील विठ्ठलनगर परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपी चिंक्या उर्फ ओंकार जगताप आणि साथीदारांनी त्याला गाठले. त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. कांबळे याच्या डोक्यात दगड मारला. या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली. कांबळे याच्या मित्राने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वारजे पोलिसांनी तातडीने तपास करत चार संशयितांना अटक केली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके हे पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...