आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची कारवाई:पुण्यात उच्चभ्रू परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; 8 तरुणींची सुटका

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात उच्चभ्रू परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 8 तरुणींची सुटका केली. पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या काेरेगाव पार्क परिसरातील ली ब्युटी स्पा या मसाज पार्लरवर छापा टाकला. या छाप्यात या तरुणींची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी सहा आरोपींवर काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांना ठोकल्या बेड्या

पोलिसांनी आज दिलेल्या माहितीनुसार, किरण चंद्रकांत काेळी (वय २९,रा. पिंपरी, पुणे), महंमद इंजामुल हुसेन (१९, रा. काेरेगाव पार्क, पुणे), मुकुल घुले, अनुज कुमार राकेश पांडे, अब्दुल बतेने, साेना निगडे (सर्व रा. पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात विश्रांतवाडी पाेलीस ठाण्यात परिविक्षाधीन नेमणुकीस असलेले पाेलिस उपनिरीक्षक सत्यवान शंकर गाैड यांनी आरोपीविराेधात फिर्याद दिली आहे.

काेरेगाव पार्क परिसरात नाॅर्थ लिबर्टी मेन रस्त्यावर लिबर्टी साेसायटी असून त्याठिकाणी दुसऱ्या मजल्यावर ली ब्युटी स्पा आहे. सदर ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकाने स्पा सेंटरवर १८ जून राेजी छापा टाकून आठ तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली. संबंधित महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करून मसेज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून या व्यवहारात ढकलले होते. पोलिसांनी यावेळी ८८ हजार रुपयेही जप्त केले.

बातम्या आणखी आहेत...