आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका:खोके सरकारने त्यांची तपास यंत्रणा विकास कामासाठी लावली तर सामाजिक परिवर्तन होईल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याचे राजकारणाबाबत विचार करण्याची गरज आपली वैचारिक बैठक कुठे गेली - खासदार सुप्रिया सुळे - Divya Marathi
सध्याचे राजकारणाबाबत विचार करण्याची गरज आपली वैचारिक बैठक कुठे गेली - खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुण्याचे पालकमंत्री कुठेच दिसून येत नाही. खाेके सरकारने त्यांची तपास यंत्रणा विकास कामासाठी लावली तर सामाजिक परिवर्तन झाले असते. सत्तेत असलेले लाेक ज्याप्रकारे बाेलतात ते याेग्य वाटत आहे का? आरक्षणावर त्यांची दुटप्पी भूमिका आहे. राज्यभरात सध्या सरकारचा केवळ सावळगोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सध्या टीव्हीवर जे राजकारण सुरु आहे ज्याची चर्चा समाजात, वर्तमानपत्रात हाेते. जे आपल्याला दिसते ते खरेच राजकारण आहे का? याचा सर्वांनी दाेन मिनिट थांबून विचार करण्याची गरज आली आहे. ज्या पद्धतीने राजकारण सुरु त्याबाबत प्रसारमाध्यमांना दाेष देत नाही कारण जे राजकीय नेते बाेलतात तेच माध्यमे दाखवतात.

मी राजकारणात कशासाठी आले हे मला माहिती आहे. परंतु आज जी चर्चा वृत्तपत्रात सुरु त्यासाठी तुम्ही राजकारणात आले का? याचा विचार केला गेला पाहिजे. आपली वैचारिक बैठक कुठे गेली आहे? पक्ष कशासाठी आहे, त्याचे धाेरण काय आहे हे पहावे असे मत खासदार सुप्रीया सुळे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बाेलताना व्यक्त केले.

सुळे म्हणाल्या, महागाई ,बेराेजगारी सध्या वाढलेली आहे. राज्यातील दाेन माेठे प्रकल्प आपल्या राज्याबाहेर गेलेले आहे हा आपल्यावर अन्याय आहे. राज्यातील ईडी सरकारने सिनारमास्ट कंपनी राज्यात रायगड मध्ये आणल्याचे सांगितले परंतु ती महाविकास आघाडीचे काळात आणली गेली कागदपत्रे तपासून पाहावे. पुण्यात अजित पवार पालकमंत्री हाेते तेव्हा विधान भवन मध्ये दर आठवडयाला अनेक नागरिक येऊन त्यांची कामे मार्गी लागत. परंतु चार ते पाच महिन्यात आत्ता बैठक हाेत नाही केवळ व्यायाम करण्यासाठी माेकळी जागा उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...