आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचे स्पष्टीकरण:पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच, मावळे शिवसेनेची ताकद; भाेंगे लावून प्रश्न सुटत नाहीत

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याचे दाखविण्यात येते परंतु त्या काही चुकीच्या बाेलल्या नसून माध्यमांनी विर्पयास केला आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेतृत्वाचा चांगल्याप्रकारे पाठिंबा आहे. त्यामुळे चुकीच्या बातम्या काेणी चालवू नये. जे वादळात, संकटात टिकून राहिले त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मावळे ही शिवसेनेची ताकद आहे असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केले.

संजय राऊत म्हणाले की, हनुमान चालिसा आम्हाला ही येते परंतु लाेकांचे दैनंदिन प्रश्न महत्वाचे आहे. अन्न, वस्त्र, निवारा, रस्ते, पाणी ही कामे शिवसेनेचे नगरसेवक करत आहे. नगरसेवक पाच वर्ष निवडून आल्यानंतर त्यांनी नेमके काय काम केले हे लाेकांपर्यंत पाेहचवले पाहिजे. काेविड काळात अतुलनीय काम सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे. राज्याचे नेतृत्व शिवसेना करत आहे. तेढ निर्माण करण्यासाठी भाेंग्याचा वापर काहीजणांकडून केला गेला. मात्र, आम्ही भाेंगे लावून विकासकामे सांगू असा टाेला त्यांनी मनसे नेते राज ठाकरे व भाजपला लगावला आहे. केवळ भाेंगे लावून प्रश्न सुटत नाही विकासकामे करावी लागतात असे ही ते यावेळी म्हणाले.

जी परिस्थिती असेल त्यामध्ये पुणे मनपावर भगवा झेंडा फडकविण्याचा आपला उद्देश आहे. शिवसंर्पक अभियान अंर्तगत माेठा मेळावा घेतला गेला त्यातून चांगले वातावरण पुण्यात निर्माण झाले. अनेक जुने-नवीन कार्यकर्ते सक्रिय झाले असून सर्वांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे. भगवा, निळा एकत्रित आल्यास महाराष्ट्राची ताकद आणखी दिसेल.पुणे शहराला दिशा देण्याचे काम आगामी काळात करावयाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...