आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोळंबलेली रेल्वे वाहतूक पूर्ववत:पुणे रेल्वे स्थानकावर सापडलेली ती वस्तू 'बॉम्ब' नव्हे; पोलीस आयुक्तांची माहिती

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे रेल्वे स्टेशनमध्ये आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू ही जिलेटीन नसल्याचे बॉम्ब शोधकाच्या तपासणीत समोर आले आहे. पुणे पोलिस अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली. ही वस्तू नष्ट करण्याचे काम सुरू आहे. तर खोळंबली रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.

स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने रेल्वे स्टेशन परिसर पोलिसांकडून खाली करण्यात आले होते आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबण्यात आल्या होत्या.

बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने रेल्वे स्टेशन परिसर पोलिसांकडून खाली करण्यात आले.
बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने रेल्वे स्टेशन परिसर पोलिसांकडून खाली करण्यात आले.

यावेळी अमिताभ गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पुणे रेल्वे स्थानकावर कोणताही बॉम्ब किंवा स्फोटके आढळलेली नाही. फलाट क्रमांक 1 आणि 2 पुन्हा रहदारीसाठी खुले करण्यात आले आहे. तसेच रेल्वे वाहतूकही पूर्ववत सुरु झाली आहे. मिळालेल्या वस्तूमध्ये कोणतेही सर्किट किंवा स्फोटक घटक आढळून आलेले नाहीत. रेल्वे पोलीस आणि पुणे पोलिसांकडून याचा समांतररित्या तपास केला जाईल.

हीच ती बॉम्ब सदृश्य वस्तू
हीच ती बॉम्ब सदृश्य वस्तू

नेमकं काय घडलं?

सकाळी 10.30 वाजता रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली होती. यानंतर फलाट क्रमांक 1 आणि 2 रिकामा करण्यात आले होते. तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने तपास करण्यात आला. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ आयुक्त घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या देखरेखीखाली शोध मोहीम सुरु होती. ही वस्तू इथे कशी आली, कोणी आणली या संदर्भात चौकशी सुरू आहे.

पुणे नियंत्रण कक्षाला बॉम्बचा निनावी फोन -
चार ते पाच दिवसांपूर्वी पुणे नियंत्रण कक्षात निनावी कॉल आला होता. पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आले आहे. अनेक नागरिकांच्या जीवाला धोका आहे. बॉम्ब कुठे ठेवला आहे याची माहिती हवी असल्यास आम्हाला सात कोटी द्या, असा निनावी फोन पोलिस नियंत्रण कक्षाला आला होता. तपास केला असता तो फेक कॉल असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज पुणे रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू आढळली आहे.

उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर स्फोटकसदृश वस्तू -
कालच उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर अशाच प्रकारच्या स्फोटकसदृश वस्तू सापडल्या होत्या. या जिलेटिनच्या कांड्या असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. ही स्फोटके सापडल्यानंतर माणकेश्वर ग्रामस्थांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. येथे राहणाऱ्या लोकांना पूर्ण सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आता पुण्यात अशाच स्फोटकसदृश वस्तू सापडल्याने याचा काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...