आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणावळ्याची घटना:वृद्ध डॉक्टरला पत्नीसह बांधून ठेवत 66 लाखांचा मुद्देमाल लांबवला; गुन्हा दाखल

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक मुलगा अमेरिकेत, दुसरा गुजरातेत आहे मणक्याचा डॉक्टर

मुंबई महामार्गावर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात सहा जणांच्या टोळक्याने एका वृद्ध डॉक्टरच्या बंगल्यावर दरोडा टाकल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. शस्त्राचा धाक दाखवून, जिवे मारण्याची धमकी देऊन दरोडेखोरांनी ५० लाख रोख रक्कम आणि १६ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. याप्रकरणी लोणावळा पोलिस ठाण्यात अज्ञात सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल यांच्या घरात हा दरोडा टाकण्यात आला असून ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. ७३ वर्षीय डॉ. हिरालाल हे बालरोगतज्ज्ञ असून लोणावळ्यात त्यांचे हॉस्पिटल आहे. खंडेलवाल व त्यांची पत्नी विजया हॉस्पिटलमधील पहिल्या मजल्यावर राहतात. रुग्णालयात रात्रपाळीला तीन कर्मचारी असतात. दरम्यान, मध्यरात्री अचानक सहा जणांचे टोळके थेट डॉक्टरांच्या बेडरूममध्ये आले.

चाकूचा धाक दाखवून “ओरडलात तर जिवे मारू’, अशी धमकी दिली. त्यानंतर दोघांचे अज्ञात दरोडेखोरांनी हात आणि पाय दोरीने बांधून कपाटाच्या चाव्या आणि पैशांची मागणी केली. घाबरलेल्या विजया यांनी ड्राॅवरमध्ये चाव्या असल्याचे सांगितले. त्यानंतर दरोडेखोरांनी मुद्देमाल लंपास केला.

एक मुलगा अमेरिकेत, दुसरा गुजरातेत आहे मणक्याचा डॉक्टर
कपाटातून तब्बल ६६ लाखांचा ऐवज चोरट्याने बाहेर काढला. यात ५० लाख रोख रक्कम आणि १६ लाखांच्या दागिन्यांचा समावेश होता. त्यानंतर चोरटे पसार झाले. डॉ.हिरालाल यांचा मोठा मुलगा गौरव हा गुजरातमध्ये मणक्याचा सर्जन असून दुसरा मुलगा वैभव हा इंजिनिअर असून तो गेली १७ वर्षे अमेरिकेत आहे. याप्रकरणी पुढील तपास लोणावळा पोलिस करत आहेत.