आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसबा गणपती:पुण्यात यंदा 25 तास मिरवणूक सुरू राहणार, मानाच्या कसबा गणपती मंडळांचा थाट निराळाच

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्बंधमुक्त गणेशोत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर आता गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीचे वेध लागले आहेत. अनंत चतुर्दशीला शुक्रवारी (९ सप्टेंबर) सकाळी मंडईतील टिळक पुतळा येथून सकाळी सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. यंदा पुण्यात २५ तासांपेक्षा अधिक काळ मिरवणूक चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीमध्ये नगारखाना, आर्ट ऑफ लिव्हिंग, प्रभात बँड, कामायनी प्रशाला, बँक ऑफ इंडिया आणि रोटरी क्लबची पथके असतील. श्री तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुसऱ्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी सतीश आढाव यांचा नगारावादनाचा गाडा आणि न्यू गंधर्व बँड पथक असेल. मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीच्या मिरवणूक सरपाले बंधू यांनी साकारलेल्या भक्तिरथातून निघणार आहे. फुलांच्या आकर्षक सजावटीने साकारलेला श्री गजमुख रथामध्ये तुळशीबाग मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक निघेल. केसरीवाडा गणपती या मानाच्या पाचव्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत बिडवे बंधू यांचा नगारावादनाचा गाडा असेल.

बातम्या आणखी आहेत...