आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • The Relief From The Heat Of Summer; The Possibility Of Pre monsoon Rains In The State, Forecast By The Meteorological Department

दिलासदायक:उन्हाच्या तडाख्यापासून मिळणार दिलासा; राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मागील महिन्यापासून उन्हाचा तडाखा जास्त प्रमाणात जाणवत आहे. एप्रिल महिन्यात राज्यातील तापमान सातत्याने वाढले. उन्हाचा पारा 46 वर जाऊन पोहोचला होता. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. म्हणूनच मे महिन्यातही उन्हाचा कडाका आणखी वाढतो की काय अशी भीती होती. पण आता या कडाक्याच्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्याचे तापमान कमी असणार आहे. साधारण मे महिन्याचे तापमान सरासरीच्या खाली असणार असल्याचा अंदाज पुणे हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच उत्तर-पश्चिम राज्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार असून संपुर्ण देशात पुर्वमोसामी पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पुर्वमोसमी पाऊस 109% असण्याचा अंदाज आहे.

या मे महिन्यामध्ये राज्यात उन्हाचा तडाखा कमी असणार आहे. हवामाम विभागाने सांगितल्याप्रमाणे चालू महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी असणार आहे. होणार असलेल्या पुर्वमोसमी पावसामुळे उन्हाची झळ जावणार नाही. असे सांगण्यात आले आहे. दरम्यान या महिन्यात गोवा, कर्नाटक या राज्यात कमाल तापनाम सरारीपेक्षा कमी असेल.

अमरावतीमध्ये आहे सर्वाधिक तापमान, तर उष्माघाताने 2 मृत्यू

अमरावतीमध्ये उन्हाचा तडाखा अधिक प्रमाणात आहे. अमरावतीचे सरासरी तापमान 46 च्या पार गेले आहे. या वाढत्या तापमानामुळे अमरावतीमध्ये उष्माघाताने दोन जणांचे बळी घेतले आहे सुभाष मोहनसिंग नोतात, जयसिंह चंदनलाल मडावी अशा मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...