आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:अधिसभेच्या 5 जागांचा निकालही जाहीर

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा पाच जागांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. उर्वरित पाचही खुल्या प्रवर्गातील जागांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. खुल्या प्रवर्गातून प्रसेनजित फडणवीस ४ हजार ४४७, सागर वैद्य ३ हजार ७११, युवराज नरवडे ३ हजार २८३, दादाभाऊ शिनलकर २ हजार ५११ तर बाकेराव बस्ते २ हजार २३० मते मिळवत विजयी झाले. परस्परविरोधी पक्षांमध्ये हा सामना अटीतटीचा झाल्याने या मोजणीच्या सोळा फेऱ्या झाल्या. खुला प्रवर्ग वगळता उर्वरित प्रवर्गांचे निकाल मंगळवारी सायंकाळी सातपर्यंत जाहीर झाले. खुल्या प्रवर्गाची मोजणी बुधवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...