आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटना यांनी धर्मादाय आयुक्तांच्या निगराणीखाली गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेतल्या. या निवडणूकमध्ये जे हरले ते सुड भावनेने संघटनेचे नाव बदनाम करीत आहेत. खोट्या तक्रारी करत आहेत. कोरोना काळात दोन वर्ष कुस्ती स्पर्धा होऊ शकला नाही. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना हुकूमशाही पद्धतीने बरखास्त करणे चुकीचे होते.
याबाबत आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आणि त्याबाबतची बाजू भक्कमपणे मांडली त्यामुळे आमची संघटना हीच खरी असल्याचा निर्णय झालेला आहे. असे मत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटना सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली आहे
कुस्तीगीर परिषदेलाच अधिकार
बाळासाहेब लांडगे म्हणाले की, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार कुस्तीगीर परिषदेला आहे. भारतीय कुस्ती महासंघाची दिशाभूल करण्यात आल्याने गैरसमजातून बरखास्तीचा निर्णय घेतला गेला होता.
लांडगे म्हणाले, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात यावी यासाठी सात जिल्ह्यांनी प्रस्ताव पाठवला आहे. संघटना वादात राज्यातील मल्लांवर परिणाम आम्ही होऊ देणार नाही. जे निवडून आलेले पूर्वीचे सदस्य मंडळ आहे तेच यापुढे कायम राहणार आहे. भारतीय कुस्तीगीर परिषद बाबत काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यात येतील.
ॲड तुषार पवार म्हणाले, भारतीय कुस्ती महासंघाने काहींच्या तक्रारीमुळे 30 जून 2022 ला कुस्तीगीर परिषदेवर बरखास्तीची कारवाई केली होती. त्या कारवाई विरोधात कुस्तीगीर परिषदेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सन 2019 ला धर्मादाय कार्यालयाच्या निरीक्षणाखाली कुस्तीगीर परिषदेची निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली.
त्यामध्ये परिषदेच्या विरुध्द असलेल्या विरोधी पॅनलचा पराभव झाला. त्याचा राग आल्याने सूडबुध्दीने व केवळ स्वतःच्या प्रसिध्दीसाठी विनाकारण परिषदेला त्रास देऊन बदनामीचे प्रयत्न सुरु केले. त्याच प्रमाणे सन 2019 ला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भ्रष्टाचार झाला नसतांना देखील भ्रष्टाचार झाला असे खोटे आरोप कुस्तीगीर परिषदेवर केले.
सदर कुस्ती स्पर्धेचे अनुदान कुणाही वयक्तिक पदाधिकारी यांचेकडे जमा न होता परिषदेच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते. सदर स्पर्धेतील सर्व व्यवहार रोखीने झाला नव्हता. रितसर व नियमाप्रमाणे बिल, व्हावचर, खर्चाचा तपशिल, खर्चाचे ऑडीट व इतर कागदपत्रांसह सदर मिळालेल्या अनुदानाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला.
भारतीय कुस्ती महासंघाच्या झालेल्या कार्यकारीणी सभेत परिषदे विरुध्द झालेला निर्णय त्यांच्या विषय पत्रिकेवर नव्हता. तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारची नोटीस परिषदेला दिलेली नव्हती. महाराष्ट्र राज्याने यापूर्वी नॅशनल कुस्ती स्पर्धा घेतलेल्या आहेत. तसेच कितीतरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, आशियन चॅम्पियनशीप, कॉमनवेल्थ, एशियन चॅम्पियनशिप अशा स्पर्धा घेतलेल्या. कोरोना काळ वगळता महारष्ट्र केसरी स्पर्धा वेळेत झालेल्या आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.