आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील प्रसिद्ध मूर्ती शिल्पकार विनाेद येलारपूरकर यांनी राज्यातील सर्वात माेठी विठ्ठलाची चाैथऱ्यासह 35 फूट उंच मूर्ती सिंहगड राेड येथील स्टुडिओत साकारली. सिव्हीइलेक प्राेजेक्ट साेल्युशन या कंपनीकडून ही मूर्ती तयार करण्याची मागणी करण्यात आली असून ती सातारा जिल्ह्यातील वाई जवळील कुडाळ गावात आषाढी एकादशीच्या दिवशी ती बसविण्यात येणार आहे.
मागील दाेन महिन्यापासून मूर्ती शिल्पकार विनाेद येलारपूरकर ही मूर्ती साकारात असून त्याकरिता त्यांना स्टुडिओतील सहा ते सात कलाकार मदत करत आहे. सिव्हिइलेक प्राेजेक्ट कंपनीचे संचालक दत्तात्रय आत्माराम भालेगरे व कमलेश आत्माराम भालेगरे यांनी ही मूर्ती तयार करण्याची कल्पना शिल्पकार येलारपूरकर यांच्याकडे मांडली हाेती.
त्यानुसार सदर सुबक मूर्ती बनविण्यात आली आहे. ही मूर्ती बनविण्याकरिता 40 किलाे वजनाची 200 मातीची पाेती लागली. तर,दीड हजार किलाे वजनाचे लाेखंडी सांगाडा व फायबर वापरण्यात आले. दहा फुटी चाैथ्यावर मूर्ती स्थापित केल्यानंतर बाजूला पेटी, तबला, वीणा, डगा ही वारकऱ्यांची वाद्य ही लावण्यात येणार आहे.
मूर्तीच्या उजव्या हातात कमल पुष्प आणि डाव्या हातात शंख अशा स्वरुपात विष्णु रुपात ही मूर्ती साकारण्यात आली आहे. पंढरपूर येथील मूर्तीच्या हातात ही अशाचप्रकारे पुष्प व शंख आहे. पंढरपूरच्या मुख्य विठ्ठल मंदिराचे डिझाईनचे काम ज्यांनी केले ते साेलापूरचे आर्टिस्ट किरण सगर यांनी मूर्तीवरील दागिन्यांचे काम केले आहे. काळया पाषणासारखे रुप या मूर्तीला देण्यात आल्याने ते विलाेभनीय दिसत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.