आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एसीबी'ची कारवाई:न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाने केसमध्ये मदतीसाठी मागतली लाच; दीड लाख स्वीकारताना बेड्या

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्हा न्यायालयातील एका वरिष्ठ लिपिकाने केसमध्ये मदत करण्यासाठी तब्बल दाेन लाख रुपयांची मागणी केली. पण त्यापैकी दीड लाख रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बेडया ठाेकल्या आहे. सचिन अशाेक देठे (वय-39,रा.राजगुरुनगर,पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

याप्रकरणी आराेपी सचिन देठे विराेधात शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 23 वर्षीय तरुणाने पोलिसांकडे आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. सचिन देठे हा पुणे जिल्हा न्यायलयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल केलेल्या तक्रारदार यांचा मावसभाऊ याची कसेमधून सुटका करण्यासाठी न्यायाधीशांना सांगुन मदत करण्यासाठी व केस निकाल मार्गी लावण्यासाठी शिवाजीनगर सत्र न्यायालयातील क्लार्क सचिन देडे याने 30 नाेव्हेंबरला दाेन लाख रुपये लाचेची मागणी केली हाेती.

सापळा रचून आरोपीला अटक

याबाबत तरुणाने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर एक डिसेंबर राेजी रात्री दहा वाजता शिवाजीनगर काेर्टाबाहेर गणेश झेराॅक्स या दुकानासमाेर लिपिक सचिन देठे यास दाेन लाख रुपयांपैकी तडजाेडीअंती दीड लाख रुपये स्विकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

याप्रकरणी पुढील तपास एसीबीच्या पोलिस निरीक्षक ज्याेती पाटील करत आहे. तसेच या प्रकरणाची कारवाई पोलिस अधीक्षक अमाेल तांबे, अपर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिली आहे.

तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

तडीपार केला असताना शहरात हत्यारासह फिरणार्‍या एकाला मुंढवा पोलिसांनी मगरपट्टा येथे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या ब्रीज खालून अटक केली. त्याच्या विरोधात एप्रिल महिन्यात तडीपारीचे आदेश काढण्यात आले होते.

सागर शंकर घोडके (22, रा.लोणकर वस्ती, मुंढवा,पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला. मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजित लकडे, गुन्हे निरीक्षक प्रदिप काकडे, सहाय्यक निरीक्षक संदिप जोरे, दिनेश राणे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...