आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नागरिकांना मदत:पोलिसांच्या संवेदनशीलतेने एक हजार ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उतारवयात ज्येष्ठ नागरिकांचा आधार हिरावून घेत नातलगांनी त्यांना वार्‍यावर सोडण्याचा प्रयत्न केल होता.विशेषतः संपत्ती, घरदार, जमीन, सोने-नाणे, ताब्यात घेत आई-वडिलांसह काका-काकी आणि जवळच्या नातलगांना सांभाळण्यास असमर्थता दर्शविली. मात्र, पुणे पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक कक्षाने नातलगांना कायद्याचा धाक दाखविल्यामुळे तब्बल एक हजार पाच जेष्ठाच्या चेहर्‍यावर हास्य फुलवले आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत जेष्ठ नागरिक कक्षाने बहुतांश अर्जांवर तोडगा काढून तक्रारदारांना न्याय दिला आहे.

ज्येष्ठ नागरिकांना वेळीच मदत मिळावी याच हेतूने एप्रिल 2017 मध्ये कक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त तक्रारींद्वारे कक्षाकडून तक्रारदारांच्या नातलगांना बोलावून घेत मध्यस्थी करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे दोन वर्षांत 1005 ज्येष्ठांचे उतारवयीन आयुष्य सुखात जाण्यास मदत झाली आहे. विशेषतः संपत्तीसाठी-वडिलांचा छळ करणे, त्यांना घरातून हाकलून देणे, सासू-सुनेच्या वादातून त्यांचा शारिरीक व मानसिक छळ करणे, किरकोळ कारणावरून आई-वडिलांसह इतर नातलगांना बेघर करणे याप्रकारे होणार्‍या छळवणुकीमुळे ज्येष्ठांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यापार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे प्राप्त तक्रारींची तातडीने उकल करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले.अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगिता बोडखे यांच्या पथकाने ज्येष्ठ तक्रारदारांच्या समस्यावर तोडगा काढला.

मुला-मुलींसह जवळच्या नातलगांकडून जेष्ठांना शारिरीक व मानसिक त्रास दिला जात होता. त्याशिवाय मालमत्तेचा वाद, आर्थिक फायद्यासाठी आई-वडिलांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती. त्यापार्श्वभूमीवर जेष्ठांच्या तक्रारींची तातडीने निराकरण करण्यासाठी पोलिसांकडून कक्षाद्वारे प्राधान्य देण्यात आले. 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे 95 तक्रारी अर्ज दाखल झाले होते. संबंधित सर्व अर्जांनुसार नातलगांना कायद्याचा धाक दाखवून प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात आली. तर 2021 मध्ये दाखल 400 तक्रारींवर जेष्ठांना न्याय देण्यात आला असून इतर प्रकरणांचीही सोडवूण करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. 2022 मध्ये जेष्ठ नागरिक कक्षाकडे 589 तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 515 अर्जांची निर्गती करून संबंधित कुटूंबियामध्ये सुसंवाद वाढविण्यात आला.

पुणे शहर अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, रामनाथ पोकळे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांची जवळच्या नातलगांकडून फसवून करून त्यांना आर्थिंक संकटात टाकले जात होते. त्यांची हेळसांड करून दुःखात लोटल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार ज्येष्ठांना दिलासा देण्यासाठी तातडीने दखल घेउन मध्यम मार्ग काढण्यात आला. संबंधित पीडितांच्या नातलगांना कायद्याचा धाक दाखविल्यामुळे तक्रारदार जेष्ठांना पुन्हा आनंदात जीवन जगण्याचा मार्ग मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...