आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून घेतली. दरम्यान उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रसन्न शेखर चिंचवडे (वय 21) असे त्या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे चिंचवडे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
रविवारी रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. त्याच्या राहत्या घरीच ही घटना घडली. चिंचवडमधील वाल्हेकरवाडी रस्त्यावर चिंचवडे कुटुंब वास्तव्यास आहे. रात्री नऊच्या सुमारास प्रसन्नने कुटुंबियांसोबत जेवण केले. त्यानंतर तो स्वत:च्या खोलीत गेला आणि वडिलांच्या परवानाधारक पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोमवारी पहाटे काळेवाडी येथील समशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उपचारादरम्यान मृत्यू
कुटुंबियांना प्रसन्नच्या खोलीमधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. यानंतर घरातील कुटुंबियांनी तातडीने वरच्या खोलीत धाव घेतली. दरम्यान त्यांना प्रसन्न जखमी अवस्थेत आढळला. यानंतर त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान चिंचवड पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.