आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • The State Government Should Help Before Waiting For The Help Of The Central Government; Devendra Fadnavis Criticizes On Thackeray Government

नुकसानग्रस्त भागाचा दौरा:केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकावर सडकून टीका

बारामती2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते : फडणवीस

शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आजपासून 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीतून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्टपणे सांगावे अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करणारच आहे. परंतु केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते

राज्यात अतिवृष्टी झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: मुख्यमंत्र्याना फोन करुन मदतीचे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकार नेहमीच मदत करते. पण मदत देण्याची राज्याची पहिली जबाबदारी आहे. त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी. मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

राज्यपालांशी वाद घालण्याची ही वेळ आहे का?

राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते. यावर फडणवीस म्हणाले, “राज्यपालांचे एखादे वाक्य आणि त्यावरुन झालेला विवाद याआधीदेखील झाला आहे. पण ही काय वादाची वेळ आहे का? आधी शेतकऱ्यांकडे लक्ष द्या”, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. बारामतीतील उंडवडी गावाची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली

आमचा दौरा घोषित झाल्यानंतर मंत्र्यांना जाग आली

शरद पवार यांना राज्य सरकारचा बचाव करावा लागतोय. या सरकारचा इतका नाकर्तेपणा बाहेर येतोय की प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या सरकारला पाठीशी घालणे एवढेच काम शरद पवार यांच्याकडे आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आमचा दौरा घोषित झाल्यानंतर या सरकारमधील अनेक पालकमंत्री आपल्या मतदारसंघात गेले. तोपर्यंत ते गेले नव्हते. आमचा दौरा घोषित झाल्यानंतर तात्काळ सर्वांची झोप उडाली. सगळे पटापट मुंबईहून आपापल्या मतदारसंघात गेले, असे देखील फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...