आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:अक्षर चांगले काढत नसल्याने विद्यार्थ्याला शिक्षिकेची मारहाण

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिलीत शिकणारा विद्यार्थी अक्षर चांगले काढत नसल्याने शिक्षिकेने त्याला मारहाण केल्याची घटना पुण्यातील वानवडी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी शिक्षिकेवर वानवडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी वानवडी पाेलिस ठाण्यात संबंधित शिक्षिकेविराेधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांचा सहा वर्षांचा मुलगा वानवडी परिसरातील लुल्लानगर येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेत आहे. मात्र, मुलाचे अक्षर चांगले नसल्याने संबंधित शिक्षिका वारंवार त्यास वर्गात आेरडत हाेती. दरम्यान, शिक्षिकेने राग अनावर झाल्यानंतर मुलास बेदम मारहाण केली. तसेच घरी सांगितले तर पुन्हा वर्गात आल्यावर आणखी मारण्याची धमकी शिक्षिकेने दिली. मात्र, मुलाने घडलेला प्रकार घरी जाऊन पालकांना सांगितला. त्यानंतर मुलाच्या पालकांनी शिक्षिकेविरोधात तक्रार दिली. आता या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...