आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीचा निकाल:विद्यार्थ्यांचा जल्लोष, ढोलताशा पथकांच्या साथीने विद्यार्थ्यांनी धरला ठेका

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांनीही किती मोठ्या प्रमाणावर होती. याचे दर्शन शुक्रवारी दुपारी शाळांच्या प्रांगणातील सेलिब्रेशनमधून आले. पुण्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांनी दणकेबाज पद्धतीने आनंद साजरा केला.

न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, रमणबाग, अहिल्यादेवी, गोळवलकर गुरुजी, डीईएस इंग्लिश मीडियम, एनईएमएस शाळेतील विद्यार्थी दहावीच्या निकालाचा आनंदोत्सव ढोल ताशाच्या गजरात साजरा केला. यावेळी 100 हून अधिक गुणवंत विद्यार्थी आणि यशस्वी दिव्यांग, अंध विद्यार्थी सहभागी झाले होते.

पुण्यातील या नामांकित शाळांना उज्ज्वल निकालाची दीर्घ परंपरा आहे. त्यामुळे सकाळी बारा वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी शाळांमध्ये गर्दी केली होती. एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होताच, विद्यार्थ्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. ढोल ताशा पथकांच्या साथीने शाळकरी मुलांनी ठेका धरला आणि एकत्रित डान्स करत आनंद साजरा केला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पेढा भरवून त्यांचे कौतूक केले.

बातम्या आणखी आहेत...