आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण करून लुटणारा जेरबंद:संशयिताला गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने केली अटक; पुणे शिऊर तालुक्यातील घटना

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणार्‍या देत तीन लाखांच्या खंडणीसाठी शिरूर तालुक्यातील डॉक्टरचे अपहरण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने अटक केली. त्याला वारजे माळवाडी परिसरातून त्याला गुरवारी ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी(19 ऑगस्ट) दिली.

पैशासाठी केले अपहरण

​​​​गौरव सुरेश बिरूंगिकर (25, रा. रामनगर, वारजे माळवाडी,पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. फेब्रुवारी महिन्यात बिंरूगीकर आणि त्याच्या इतर पाच साथीदारांनी तीन लाख रुपयांची मागणी करत शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका डॉक्टरचे अपहरण केले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, उर्वरीत चौघांना शोध सुरू होता. खंडणी विरोधी पथक एकचे कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत होते. या दरम्यान अपहरणाच्या गुन्ह्यातील पाहीजे. आरोपी बिरूंगीकर हा वारजे माळवाडी पुलाखाली येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून बिंरूंगीकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांच्या मदतीने पैशांसाठी डॉक्टरचे अपहरण केल्याची कबूल केले. यानुसार पथकाने बिरूंगीकर याला अटक करून शिरूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास जाधव, अंमलदार नितीन कांबळे, किरण ठवरे, अमोल आवाड, दुर्योधन गुरव, विजय कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अपहरण करत तोडला एकाचा दात

नळ जोडण्याच्या कनेक्शनसाठी रस्त्सावर थाबलेल्या एकाचे अपहरण करून त्याला मारहाण करत त्याचा दात पाडार्‍या तिघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. सचिन पांडुरंग चौधरी, सुरज विजय चौधरी, संदीप कुंभार (सर्व रा. लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा पुणे) या तीन सराईतांना अटक करण्यात आली आहे. याबाबत किरण बजरंग गवळी (40, रा. लोणकरनगर, अनंततारा सोसायटी समोर, केशवनगर, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 16 ऑगस्ट रोजी केशवनगर येथील पवार वस्ती येथे घडला आहे. याबाबत कोंढवा पोलिस पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...