आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात वाढती 'दादा'गिरी:तलवारीला धार लावून न दिल्यामुळे केला वार; पुण्यातील एम. के. फेब्रीकेशनमधील घटना

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तलवारीला धार लावून न दिल्याच्या रागातून टोळक्याने तरूणाला मारहाण करून त्याच्यावर तलवारीने वार करीत जखमी केले. ही घटना 18 जूनला संध्याकाळी चारच्या सुमारास नवी खडकीतील सुभाषनगरमध्ये घडली.

हरजितसिंग (रा. पोते वस्ती, येरवडा ,पुणे) याच्यासह तीन ते चार जणांविरूद्ध येरवडा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाकिब मलीक (वय 24 रा. येरवडा,पुणे ) असे जखमीचे नाव आहे.याप्रकरणी आरोपींवर भादविक 307,504, 506 (2), महा.पो.का.क. 37 (1) 135, आर्म अ‍ॅक्ट 4 (25), क्रिमीनल लॉ अमेंन्डमेंट अ‍ॅक्ट क. 7 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी खडकी परिसरात एम. के. फेब्रीकेशनमध्ये शाकिब कामाला असून त्याची हरजितसिंग सोबत तोंडओळख आहे.१८ जूनला चारच्या सुमारास फिर्यादी हे एम.के. फेब्रीकेशनचे दुकानात फेबरीकेशनचे काम करीत असताना, फिर्यादी यांचे तोंड ओळखीचे इसम व त्याचे सोबत इतर दोन ते तीन साथीदार यांनी हाता मध्ये तलवारी व सुरे घेवुन दुकानामध्ये आले. त्यांच्याकडील तलवारी व सुऱ्याला धार लावण्यास फिर्यादी यांना सांगितले असता, फिर्यादी यांनी त्यास नकार दिला असता, त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताने व लाथा-बुक्यानी मारहाण करुन फिर्यादीस तू तलवारीला धार लावून का देत नाही, तुला आता जीवंत सोडणार नाही असे म्हणुन त्याने त्याचे हातातील तलवारीने फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने, त्यांचे डोक्यामध्ये वार केला असता तो फिर्यादीने हुकवला व तो वार त्यांचे डाव्या हाताचे कोपरावर बसुन, त्यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच फिर्यादी हे घाबरुन तेथुन पळुन जावु लागले असता इसमांनी कोई बिच मे आगया तो उसको छोडुंगा नही, मार डालुगा असे म्हणून सदर परिसरात दहशत निर्माण केली आहे.याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...