आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लेखोरांचे लक्ष्य मी नाही तर माजी मंत्री तानाजी सावंत होते:सावंतांची सुरक्षा वाढवावी; माजी मंत्री उदय सामंत यांचा खळबळजनक खुलासा

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी रात्री कात्रज चाैकात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा संपल्यानंतर घरी परतत असलेल्या शिवसैनिकांनी त्याठिकाणावरुन जाणाऱ्या माजी मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला करुन सामंत यांच्या गाडीच्या काचा फाेडल्या. हल्लेखाेरांचे लक्ष्य मी नव्हताे तर माजी मंत्री तानाजी सावंत हे हाेते त्यामुळे त्यांची ही सुरक्षा वाढवणे गरजेचे आहे असा खळबळजनक खुलासा माजी मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी केला आहे.

याप्रकरणी उदय सामंत म्हणाले, शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांचा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम हाेता. सदर कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री हे कात्रज परिसरात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या घरी भेट देण्यास जात हाेते. त्यामुळे त्यांच्या ताफ्यानंतर मी ही सदर ठिकाणी जात हाेताे. कात्रज परिसरात एका चाैकात गाडी सिग्नलला थांबली हाेती. माझ्या गाडी जवळ 70 - 80 जणांचा एक जमाव हाेता. माझ्या बाजूला दाेन गाडया येऊन थांबल्या त्यातून 10-12 लाेक उतरले. त्यांच्या हातात हत्यारे हाेती व त्यांनी गाडीवर हल्ला केला. गाडीत येण्याचा ते प्रयत्न करत हाेते. मी त्यांना प्रतिकार केला नाही, पाेलीसांनी माझा ताफा सुखरुप पुढे नेला. सभेत आक्रमक भाषण हाेऊ शकतात परंतु माझ्यावर हल्ला करताना जी हत्यारे हाेती ती सभेला घेऊन जाण्याचे काहीच कारण नव्हते. सभेला लाेक हत्यारे घेऊन जात असतील तर नेमकी सभा कशाकरिता हाेते हे मला समजत नाही. सदर लाेक मला गद्दार म्हणत हाेती, शिवीगाळ करत हाेती. अशा भ्याड हल्लयांना मी घाबरत नाही. मी शांत म्हणजे हतबल नाही. याप्रकरणाची पूर्ण चाैकशी झाली पाहिजे हे राजकीय दृष्टीने घातक आहे.

बातम्या आणखी आहेत...