आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागडी सायकल आणि मोबाईल चोरणार्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सायकल आणि दोन मोबाइल असा 40 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. अभिषेक मलप्पा हावलेकर (वय 20 रा. आगम पार्क,) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
भारती विद्यापीठ ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ आणि उपनिरीक्षक धिरज गुप्ता हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सच्चाईमाता, कात्रज परिसरात महागडी सायकल चोरणारा थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अभिषेकला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सायकल आणि दोन मोबाइल जप्त केले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहीरट, पोलिस निरीक्षक विजय पुराणिक, एपीआय अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, शैलेश साठे, रविंद्र चिप्पा, विश्वनाथ गोणे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, अशिष गायकवाड, विक्रम सावंत यांनी केली.
जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार
जुन्या वादातून अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वारकरून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना धायरीत घडली.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात प्रशांत सुरेश कांबळे (वय 18, रा. कुंभारचावडी, धायरी,पुणे) याने तक्रार दिली आहे. प्रशांत याघटनेत जखमी झाला आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे धायरीतील भैरवनाथ मंदिरासमोर मंगळवारी रात्री साडेसात वाजता घडली असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.
काय आहे घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कांबळे, संविधान वंजारी, साहील सुपेकर आणि संतोष पासवान हे चौघे गप्पा मारत बसले होते. तेथेच प्रशांत कांबळे याची भाजीची हातगाडी असते. संविधान वंजारी याची एका अल्पवयीन मुलाबरोबर भांडणे झाली होती. ते चौघे अल्पवयीन मुले आली. त्यांनी संविधान वंजारी याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी हे सोडविण्यासाठी मध्ये पडले. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना बांबुने मारहाण केली. त्यानंतर काही वेळाने ते चार जण पुन्हा तेथे आले. त्यांना पाहून फिर्यादी व त्यांचे मित्र पळून जाऊ लागले. तेव्हा त्यांनी प्रशांत याला पकडून कोयत्याने डोक्यात वार करुन त्यांना गंभीर जखमी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.