आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसमध्ये चढताना महिलेचे 1.75 लाखांचे मंगळसूत्र लंपास:पुणे रेल्वे स्थानक परिसरातील बसस्थानकात घडली घटना

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसमध्ये शिरताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पर्समधून तब्बल 1 लाख 80 हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना 30 नोव्हेंबरला सकाळी 11.30 सुमारास पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक बसस्थानकावर घडली. याप्रकरणी वहिदा शेख (वय 52 रा. माहुली सातारा) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादा महिला कामानिमित्त पुणे स्टेशन परिसरात आली होती. घटना घडल्यानंतर काही वेळानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी सहय्यक पोलीस फौजदार काळे तपास करीत आहेत.

पुण्यातील येरवड्यात महिलेचे मंगळसूत्र चोरले

कपडे खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 75 हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 30 नोव्हेंबरला पावणेबाराच्या सुमारास येरवड्यातील नागपूर चाळ परिसरातील दुकानात घडली. याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस अमलदार एस थिकोळ तपास करीत आहेत.

महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर हल्ला

फुटपाथवर बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरूवात केली असून, सूसगावात ही कारवाई सुरू असताना पथकावर हल्ला करून कारवाईत अडथळा आणल्याचा प्रकार घडला आहे. तर गाडीवर दगडफेककरून गोंधळ घातला. याप्रकरणी सहायक अतिक्रमण निरीक्षक राकेश काची यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे .

प्रिया बागल (वय 20), राणी बागल (वय 40), बाळु बागल (वय 45 सर्व रा. सूस रोड) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी पावणेसहा वाजता पाषाण येथील शिवशक्ती चौकात घडला.

अतिक्रमण विभागाच्या ट्रकवर दगडफेक

राकेश काची हे औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयात सहायक अतिक्रमण निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पाषाण येथील शिवशक्ती चौकात अतिक्रमण विभागाची बेकायदेशीर व्यवसायिकांवर कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी बागल हे फुटपाथवर फळभाजी घेऊन बसले होते. महापालिका कर्मचाऱ्यांनी साहित्य जप्त करत होते. त्यावेळी बागल यांनी त्यांना विरोध केला. सरकारी कामात अडथळा निर्माण करुन शिवीगाळ केली. अतिक्रमण विभागाच्या ट्रकवर दगडफेक केली.

बातम्या आणखी आहेत...