आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • The Victory Of Shiv Sena In Mumbai Is The Moral Victory Of Shiv Sena In The Fact That Amit Shah Has To Come To Mumbai; Ambadas Danve's Criticism Of BJP

शिवसेनेचा मुंबईतला विजय निश्‍चित:अमित शहांना मुंबईत यावे लागणे यातच शिवसेनेचा नैतिक विजय; अंबादास दानवेंची भाजपवर टीका

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचा प्रत्येक सैनिक सत्ते असो अथवा नसो नेहमी जमिनीवरच असतो.शिवसेना फक्त निवडणुकीसाठी काम करत नाही तर आम्ही जनतेसाठी काम करतो. त्यामुळे आमचा मुंबईतला विजय निश्‍चित आहे असा आशावाद विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी पुण्यात व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते झाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच अंबादास दानवे पुणे. भेटीवर आले. पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांना दानवे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह भेट दिल्या. त्याचप्रमाणे शिवाजीनगर भागातील विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि गणरायाचे दर्शन घेतले.

राज्य सरकारवर टीका करताना दानवे म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मुंबई महापालिका जिंकण्यासाठी स्वत:ला मुंबईत यावे लागते, यातच शिवसेनेचा नैतिक विजय आहे. प्रत्यक्षात मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा विजय दैदिप्यमान असेल, हेही त्यांनी लक्षात घ्यावे. मागील 56 वर्षे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर नियमितपणे होत आहे.

यावर्षीदेखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्कवरच हा मेळावा दिमाखात होईल. ज्या राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' दाखवून कोणाला लक्ष्य केले. ते आता नेमके काय बोलणार याकडे सामान्य जनतेचे लक्ष असेल अशी टीका त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा यांच्या संभाव्य युती संदर्भात केली.

सरकारच्या दडपशाहीला घाबरत नाही

अंबादास दानवे म्हणाले, मंत्री उदय सामंत यांच्या मोटारीवर शिवसैनिकांकडून हल्ला झाला, असे सांगण्यात आले होते. त्यावेळी अनेक शिवसैनिकांना अटक करण्यात आली. वास्तविक राज्य सरकारची ही दडपशाही आहे. मात्र, अशा दडपशाहीला आम्ही घाबरत नाही.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतले दर्शन

मी दरवेळेस पुण्यात आलो की इथं येत असतो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला पण आज गणेशोत्सवात येत असताना बाप्पाला हीच प्रार्थना केली की हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम, गद्दारी मुक्त होउदे. या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे जे विचार रुजलेले गद्दारीचे जे रुजू पाहतात याच नामोनिशाण मिटू दे अशी भावना अंबादास दानवे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...