आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:सोशल डिस्टंसिंगसाठी गावातील नागरिक करतात छत्रीचा वापर, गावात आतापर्यंत एकही संक्रमित नाही

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंचर ग्राम पंचायतीच्या नागरिकांचा स्तुत्य उपक्रम, पाऊस आणि उन्हासोबत कोरोनापासून बचाव
Advertisement
Advertisement

कोरोना विरोधातील लढाई पुण्याच्या एका गावातील नागरिकांनी अनोखा उपक्रम राबवला आङे. कोरोनापासून बचावासाठी लोक छत्रीचा वापर करत आहेत. पाऊस आणि उन्हासोबतच छत्री येथील नागरिकांना कोरोनापासून वाचवत आहे. येथील लोक छत्रीचा सोशल डिस्टंसिंगसाठी वापर करत आहेत. बहुदाः या कारणामुळेच 50 हजार लोकसंख्येच्या या गावात आतापर्यंत एकही कोरोना संक्रमित रुग्ण आढळला नाही.

सवलती मिळाल्यानंतर थोडी चिंता वाढली

एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुणे-नाशिक महामार्गावर 50,000 लोकसंख्या असलेल्या मंचर ग्राम पंचायतीत छत्रीचा एकमेकांपासून दूर राहण्यासाठी वापर केला जात आहे. गावचे सरपंच दत्ता गंजाळे म्हणाले की, लॉकडाउनच्या नियमात सवलती देण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबईवरुन मोठ्या संख्येने लोक येत आहेत. यामुळे गावात संक्रमणाची चिंता वाढली आहे. 

केरळच्या गावावरुन सुचली कल्पना

या गावातील लोक केरळच्या अलप्पुझाच्या थन्नीरमुक्कोममध्ये आमलात आणलेल्या उपक्रमाच्या पाउलावर पाऊल ठेवत आहेत. सरपंच सांगतात की, एकमेकांपासून दूर राहण्यासाठी छत्रीचा वापर करण्यात केरळचे मॉडल उपयोगी ठरले. यामुळेच आम्ही गावातही असे करण्याचे ठरवले. 

Advertisement
0