आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशवंतांच्या सत्कार सोहळा:अधिकाऱ्यांचे काम आव्हानात्मक असते , ते कल्पकतेने करण्याची गरज : राजेश पाटील

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘प्रशासकीय सेवा ही आव्हानात्मक असते, निवडीनंतर तुम्ही प्रत्यक्ष काम करताना काय बदल घडवता हे महत्त्वाचे ठरते. प्रशासकीय व्यवस्था ही तुम्ही नसले तरी काम करतच असते त्यामुळे तुमच्या वेगळेपणाची छाप कामाद्वारे पडणे महत्त्वाचे असते,’ असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, आयएएस राजेश पाटील यांनी यूपीएससी यशवंतांच्या सत्कार सोहळ्यात व्यक्त केले.

परीक्षा देणे व पास होणे यापेक्षा प्रशासनात नक्की कशासाठी जायचे याचे योग्य उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याकडे असले पाहिजे. अधिकारी म्हणून निवड झालेल्यांनी प्रशासनात गेल्यावर लहानपणापासूनची सपोर्ट सिस्टिम जपून ठेवण्याचे आवाहनही राजेश पाटील यांनी केले. द युनिक अकॅडमीच्या वतीने आयोजित यूपीएससी यशवंतांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

द युनिक अकॅडमीतून मार्गदर्शन घेतलेल्या ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यूपीएससी निकालात यश मिळविले आहे. संस्थेच्या स्थापनेपासूनच यशवंतांचा अभिनंदन व कौतुक सोहळा करण्याची युनिकची परंपरा आहे. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर हा सत्कार सोहळा होत असल्याबद्दल द युनिक अकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव यांनी आनंद व्यक्त केला. युनिक एक संस्था म्हणून परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांसाठी त्यांचा निकाल सुकर व्हावा यासाठी राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती जाधव यांनी दिली.

यावेळी तुकाराम जाधव व महेश शिरापूरकर लिखित भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया खंड एकचे प्रकाशन झाले. तसेच एनसीईआरटी पॅटर्नवर आधारित पुस्तक मालिकेतील सात पुस्तकांचे देखील प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयआरएस अधिकारी सुरेंद्रकुमार मानकोसकर यांनी आईवडील हे आपल्या यशाचे मानकरी असतात मात्र घरची प्रतिकूल परिस्थिती ही कधीच अपयशाचे कारण नसले पाहिजे असे सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...