आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामन:शांती, शारीरिक स्वास्थ्य आणि कामातील उत्साह मिळविण्यासाठी योगाच्या रूपाने भारताने जगाला 'सॉफ्ट पॉवर'ची भेट दिली असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
पुणे विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने जागतिक योगदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. या कार्यक्रमात 100 कर्मचारी सहभागी झाले होते. विमानतळ प्राधिकरणाचे संचालक संतोष ढोके, व्यवस्थापकीय संचालक गगन मलिक, माजी नगरसेवक योगेश मुळीक, डॉ. संदीप बुटाला. पतंजली योग संस्थेचे अंकुश नवले उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, योगा ही भारताची ताकद आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. नियमित योगासने केल्याने दिवसभर उत्साहात राहातो, आनंद आणि चपळता वाढते. योगाचा प्रसार करण्यासाठी 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव 190 देशांसमोर ठेवला. त्याला जगाने मान्यता दिली. भारताची ही प्राचीन परंपरा सर्व देशांनी स्वीकारली. आज 193 देशांत योग दिनाचे कार्यक्रम होत आहेत.
योगाच्या माध्यमातून क्रांती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योगाचा प्रचार केला आहे. त्यांनी योगाच्या माध्यमातून क्रांती घडविली आहे. योग साधना करून प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात क्रांती घडवू शकतो असे विचार खासदार गिरीष बापट यांनी व्यक्त केले.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, तर्फे ८ आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून आयुष मंत्रालय आणि पतांजली योग पीठ यांच्या सहकार्याने कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात योग महोत्सावाचे आयोजन केले. मानवतेसाठी योग ही संकल्पना या वर्षी ठेवण्यात आली होती. यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, तेरी पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे, पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी योग शिक्षक बापू पाडळकर, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, स्कूल ऑफ योगाचे विभागप्रमुख प्रा. निरंजन खैरे व स्कूल ऑफ पीस स्टडीचे अधिष्ठाता प्रा.डॉ.मिलिंद पात्र हे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.