आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझादी का अमृत महोत्सवां’तर्गत कार्यक्रम:उषा उत्थुप यांच्या गाण्यांवर पुण्यात तरुणाई थिरकली

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्या आल्या, त्या गायल्या आणि तरुणाई थिरकली.. वितस्था महोत्सवात. महोत्सवातील दुसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात हिंदी, मराठी, काश्मिरी-डोगरी गाणी सादर करून प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांनी रसिकांवर सुरांची मोहिनी घातली. ‘आझादी का अमृत महोत्सवां’तर्गत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आयोजित वितस्था (काश्मीर) महोत्सव एमआयटी पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड परिसरात सुरू आहे.

उषा उत्थुप यांनी ‘जाने जा’, ‘दम मारो दम’, नाटू नाटू’ या गाण्यांबरोबरच ‘डॉन को पकडना मुश्कील ही नही नामुमकिन है’ असे सांगत तरुणाईला आपलेसे केले. डॉन म्हणजे आपला भारत देश आहे असे सांगून रसिकांची मने जिंकली. दुनिया मे लोगों को, मोनिका, आ देखे जरा, जिते है शानसे, रंभा हो, हरी ओम हरी या प्रसिद्ध गाण्यांसह काश्मिरी, डोगरी गीते सादर करत पूर्ण मैफलीचा माहोल बदलून टाकला. पुणेकरांच्या आग्रहास्तव ‘ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं’ या मराठी गाण्याने दादा कोंडकेंच्या आठवणी जागविल्या. नाटू नाटू गाण्यावर युवा पिढीने स्टेजवर एकच दंगा केला.