आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभिकाऱ्याचा वेष धारण करुन मोबाईल शॉपी फोडणाऱ्या एकास लष्कर पोलिसांनी अटक केली. त्याने चोरी केलेल्या 18 लाखाच्या ऐवजापैकी साडेनऊ लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
असिम शब्बी शाहा (23, रा गणेशपेठ,पुणे ) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचा मोबाईल खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तर चोरीचा मोबाईल विकत घेतल्याप्रकरणी केदार शिंदे यासही अटक केली आहे.
लष्कर पोलीस ठाण्यात मोबाईल शॉपी मालक रितेश श्याम नवले यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या महात्मा गांधी रस्त्यावरील पाविता एंटरप्रायजेस मोबाईल शॉपीमधून 22 जानेवारी रोजी चोरी झाली होती. दुकानाचे शटर तसेच मेन बिल्डींगचे शटरचे लॉक तोडुन दुकानातील सॅमसंग कंपनीचे 18 मोबाईल, एक लॅपटॉप व आणि रोख 6 लाख रुपये असा एकुण 18 लाख 10 रुपयांचा माल चोरीस गेला होता. या गुन्हयाचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये असिम शाह दुचाकी गाडी दुर अंतरावर पार्क करुन भिकाऱ्याचा वेष धारण
करुन दुकानाबाहेर झोपल्याचे दिसले. यानंतर मध्यरात्री दुकानाचे शटर कटावणीने उचकटून त्याने चोरी केली. दरम्यान चोरीस गेलेले सर्व मोबाईचे आय एम ई आय नंबर ट्रेसिंगसाठी देण्यात आले होते.
केदार शिंदे ( रा. लोहियानगर,पुणे ) याने चोरीच्या मोबाईलचा वापर केल्याची माहिती प्राप्त झाली . त्यानुसार केदार शिंदे यांस ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने असिम शाहा याचेकडुन विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार असिम शाहा यांस एक एप्रिलला अटक केली. त्याचेकडुन 9 लाख 45 हजार रु किं 14 मोबाईलस जप्त करण्यात आले
ही कारवाई पोलीस उप आयुक्त स्मर्ताना पाटील, सहायक पोलीस आयुक्त आर राजे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम,राजेश तटकरे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रियंका शेळके, सहायक पोलीस निरिक्षक शितलकुमार गायकवाड, उप निरीक्षक कांबळे, अंमलदार कदम, शिंदे, रमेश चौधर, भारमळ, मेंगे, चव्हाण, मंगेश बोऱ्हाडे , पोलीस नाईक कोळी , मांजरे, तांबोळी, राऊत यांनी केलेली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.