आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल कोश्यारींची पंतप्रधानांवर स्तुतीसुमने:म्हणाले- नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय पातळीवर एकही भ्रष्टाचार नाही

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मंगळवारी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधान भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ध्वजारोहणानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिकांची भेट घेतली व त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्यपाल म्हणाले की...

जिल्हा परिषदेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुण्यात आयोजित मेळाव्याला संबोधित करताना कोश्यारी म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या आठ वर्षात केंद्रीय पातळीवर एकही भ्रष्टाचार झाला नाही. पंतप्रधान मोदींना जनतेच्या पाठिंब्याने देशातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करायचे आहे. गेल्या आठ वर्षापासून पंतप्रधान मोदी हे सरकारचे नेतृत्व करत आहेत.

भ्रष्टाचाराचे कधी ऐकले?

कोश्यारी म्हणाले, केंद्रीय स्तरावर भ्रष्टाचाराबद्दल ऐकले आहे का? काही ठिकाणी (राज्यात) अधिकारी लेखी देतात की नेते त्यांच्याकडून लाच मागत आहेत. हे देशाचे किती दुर्दैव आहे. पण केंद्रातील कोणत्याही मंत्र्याचा किंवा पंतप्रधानाचा भ्रष्टाचार झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का, असा सवाल त्यांनी केला.

समर्पण आत्मसात करा

कोश्यारी म्हणाले की, पंतप्रधान मोदींना देशातून भ्रष्टाचार उखडून टाकायचा आहे आणि त्यासाठी नागरिकांच्या पाठिंब्याची गरज आहे. पुढील 25 वर्षांत भारताला 'जगतगुरू' (जागतिक नेता) बनवण्यासाठी प्रत्येकाने कठोर परिश्रम केले पाहिजे. प्रामाणिकपणाचा सराव केला पाहिजे आणि देशाप्रती 'समर्पण'ची भावना आत्मसात केली पाहिजे.

रस्ता सुरक्षा रॅलीचा शुभारंभ

याशिवाय, राज्यपालांच्या हस्ते रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे प्रादेशिक विभाग आणि शेखर नायडू मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीचा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...