आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाेबत जी चर्चा करण्यात येते ती राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने असते. आम्ही एकत्र बसून विचार-विनिमय करताे. त्यामुळे आमच्यात काेणतेही वाद नाहीत. पर्यायाने महाविकास आघाडीत अजिबात अस्थिरता नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले, खासदार संजय राऊत यांना मातोश्रीवर मुलाखत दिली, त्यात मला कमीपणा वाटत नाही. मुलाखतीनंतर मातोश्रीवर मंत्री, मुख्यमंत्र्यांसाेबत बैठक घेतली. प्रसारमाध्यमांकडून आमच्या आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न हाेत आहे. परंतु, त्याने काहीही साध्य हाेणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या गाेष्टी गतीने करायच्या हाेत्या त्यांना काेराेनामुळे मर्यादा आल्या. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. राज्याचे नेतृत्व करणारे लाेक बाहेर पडल्यानंतर त्यांच्याजवळ लाेकांची गर्दी हाेते. त्यामुळे बैठका, दाैरे, भेटीगाठी टाळण्यात येत आहेत. यापुढील काळात सरकारला काही खर्च कमी करावे लागतील. बजेटमध्ये जी तरतूद केली आहे, ताे निधी काेराेनातून सावरण्यास लाेकांना साहाय्य म्हणून द्यावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.
पवार म्हणाले, मी संरक्षणमंत्री असताना १९९३ मध्ये चीनमध्ये गेलाे हाेताे. तेव्हा चीनसोबत सीमेवर शस्त्रे न वापरण्याचा निर्णय झाला हाेता. १९६२ च्या युद्धानंतर पंडित नेहरू देखील सीमेवर गेले हाेते. यशवंतराव चव्हाण हे संरक्षणमंत्री असताना तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी सीमेवर गेल्या हाेत्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.