आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेशावर:फाळणीनंतर पाकमध्ये कोणतेच नवे मंदिर नाही, जुन्यांवर माफियांचा ताबा

पेशावरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऐतिहासिक मंदिर भग्नावस्थेत, याच्या देखभाल व दुरुस्तीसाठीही सरकार करत नाही मदत

पाकच्या लोकसंख्येत सुमारे अडीच टक्के (७५ लाख) हिंदू आहेत. एवढी मोठी संख्या असूनही फाळणीच्या ७४ वर्षांनंतरही पाकमध्ये मंदिर बांधले गेले नाही. हिंदू व शीख भारतात गेल्यानंतर त्यांच्या धार्मिक स्थळांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या इव्हॅन्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाचे (ईटीपीबी) तारिक वजीर यांनी सांगितले, स्वातंत्र्यानंतर देशात एकही मंदिर बांधले गेले नाही, तर २८६ मंदिरे कोर्टकज्जांमुळे बंद झाली. स्थिती अशी आहे की, दोन हजार वर्षे ऐतिहासिक मंदिरांसह अनेक धार्मिक स्थळांवर माफियांचा ताबा आहे.

तारिक वजीर यांच्यानुसार देशात सर्वाधिक २७५ मंदिरे पंजाबात आहेत. हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सिंधमध्ये ५३, खैबर पख्तूनख्वामध्ये २५ व बलुचिस्तानात १२ मंदिरे आहेत. यात १४ ची देखभाल ईटीपीबी करते, तर ६५ ची जबाबदारी हिंदूंकडे आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खैबर पख्तूनख्वामध्ये जमियत उलेमा-ए- इस्लाम पक्षाच्या लोकांनी एका मंदिराला आग लावली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अल्पसंख्याक धार्मिक स्थळांची स्थिती जाणून घेण्यासाठी आयोग स्थापन केला.

गोरखनाथ मंदिर : ६४ वर्षांनी खुले; वारसा आहे, मात्र संरक्षण नाही
पेशावरमधील गोरघत्री भागातील नाथ संप्रदायाचे गोरखनाथ मंदिर १९ व्या शतकाच्या मध्यात बांधण्यात आले. फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीमुळे मंदिर बंद करण्यात आले. मोठ्या कायदेशीर लढाईनंतर पेशावर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून २०११ मध्ये मंदिर पुन्हा उघडण्यात आले. मंदिराचे व्यवस्थापन बघणारे सरपंच काका राम यांनी सांगितले, २०० वर्षे जुन्या या मंदिराचे अनेक भाग अजूनही मूळ रूपात आहेत. पुरातत्त्व विभागाने मंदिराला राष्ट्रीय वारसा तर जाहीर केले. मात्र त्याचे संरक्षण व देखभालीसाठी काहीच केले नाही. ऐतिहासिक मंदिर वाचवता यावे म्हणून आम्ही वैयक्तिकरीत्या काही तरी करतो. त्याची दुरुस्ती न केल्यास एखाद्या दिवशी मंदिर कोसळेल. मंदिरात पूजेसाठी कोहटहून आलेले हिंदू नेते राजेश चंद यांनी सांगितले, आम्ही मंदिरात विशेष पूजेचे आयोजन केले आहे. एकमेकांशी जोडले राहावेत म्हणून आम्ही संपूर्ण पेशावरहून समुदायातील लोकांना बोलावतो.

पंज तीरथ : हजारो वर्षे जुन्या मंदिराच्या जागेवर उभारले पार्क

पेशावरातील प्राचीन मंदिर पंज तीरथला २०१९ मध्ये राष्ट्रीय वारसा जाहीर करण्यात आले व पूजेसाठी खुले करण्याची घोषणा झाली. मात्र, तसे झाले नाही. खैबर पख्तूनख्वा संग्रहालयाचे संचालक डॉ. अब्दुल समद सांगतात, पंज तीरथचा उल्लेख हजारो वर्षे जुन्या ‘महाभारत’सह इतर पवित्र ग्रंथात आहे. मंदिर परिसरात पांडवांच्या नावाने पाच कुंड होते. मात्र आता अवशेष शिल्लक आहेत. मोठ्या भागावर ताबा करत चाचा युनूस पार्क बनण्यात आला. पेशावर हिंदू पंचायतीच्या राजपूत वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष अनिलकुमार यांनी सांगितले, मंदिराच्या जागेवर पार्क आहे. जीटी रोडवर असल्याने जमिनीची किंमत कोट्यवधीत आहे. म्हणून भूमाफियांचा जमिनीवर डोळा आहे. पेशावरचे धार्मिक नेते व पंडित हारुण दयाल सांगतात, राजधानीत चार- पांच मंदिरे अशी आहेत, जेथे हिंदू नियमित पूजेसाठी येतात, तर ११ मंदिरे खटल्यांमुळे बंद आहेत. तेथे पूजेला परवानगी नाही.

बातम्या आणखी आहेत...