आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 31 तास 30 मिनिटात पार पडली मिरवणूक:गणेशोत्सव मिरणुकीत कोणतीही बाधा नाही; पुणे पोलिस आयुक्तांची माहिती

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा झाला. विसर्जन मिरवणूकही निर्विघ्नपणे पार पडली असून साधारणपणे 3 हजारांवर मंडळांनी बाप्पांचे विसर्जन केले आहे. बाप्पांच्या आर्शिवादाने आणि भाविकांसह मंडळांच्या सहकार्याने मिरवूणकीत कोणतीही बाधा झाली नाही, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान तब्बल 31 तास 30 मिनिटे अशी विक्रमी पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पार पडली.

यांची होती उपस्थिती

यावेळी अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, उपायुक्त राहूल श्रीरामे, उपायुक्त आर.राजा उपस्थित होते.

काय म्हणाले गुप्ता?

गुप्ता म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह पुणेकरांनी अतिशय दिमाखदारपणे उत्सव साजरा केला आहे. विशेषतः शहरातील सर्व मंडळांसह भाविकांनी पोलिसांना वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे गणेशोत्सवात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिसांवर जास्त ताण आला नाही. त्यामुळे मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो.

भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करताना शिस्तबद्ध पारंपारिक ढोल-ताशा पथकांपासून तरुणाईचा उत्साह पाहायला मिळाला. भाविक आणि हौशी पर्यटकांच्या तुडूंब गर्दीने विसर्जन मिरवणूक मार्ग फुलून गेले होते. तसेच उत्सव काळात मध्यवर्ती वाहतूक वळवल्यानंतर चालकांनीही पोलिसांना मोठे सहकार्य केले.

पोलिसांच्या कार्याला यश

पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देउन बहुतांश गणपती मंडळांनी शिस्तीचे दर्शन घडवले आहे. मात्र, मानाच्या गणपती विसर्जन मिरवणूकीसाठी यंदा जास्त वेळ लागला. त्याशिवाय काही ठिकाणी ध्वनीवर्धकही मोठ्या क्षमतेने वाजवल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच काही मोबाइल चोरट्यांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

गणशोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचला

ढोल-ताशा पथकांचा दणदणाट,पारंपारिक रेलचेलमुळे यंदा गणशोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचला होता. अशाच शिस्तीने, इकोफ्रेन्डली गणेशोत्सव साजरा करण्याची शक्ती बाप्पा सर्र्वांना देईल, अशी प्रार्थना त्यांनी केली.

कर्मचारी अन् अधिकारी तब्बल 46 तास ऑनड्युटी

गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेची खबरदारी घेण्यासाठी सीपी टू पीसी (पोलिस आयुक्त ते अमंलदार ) असा साडेआठ हजारांवर फौजफाटा शहरात तब्बल 46 तास ऑनड्युटी होता. बॉम्ब शोधक व नाशक पथक, गुन्हे शाखेची पथके, साध्या वेशातील कर्मचारी अधिकारी दिवसरात्र पेट्रोलिंग करत होते. त्यामुळे महिलांची छेडछाड रोखणे, गर्दीवरील नियंत्रण, टवाळखोरांकडून धिंगाण्याला आळा बसला होता.

बातम्या आणखी आहेत...