आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात धर्मांतरबंदी, लव्ह जिहादविरोधी कायदा असावा:आळंदीच्या वारकरी महाअधिवेशनात वारकर्‍यांची मागणी

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलींवर चांगले संस्कार केल्यास आणि त्यांना धर्मशिक्षण दिल्यास त्या लव्ह जिहादाला बळी पडणार नाहीत. स्वतःची मुले काय करतात, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. इंग्रजांनी वैदीक सनातन शिक्षण व्यवस्था मोडून मॅकोले शिक्षण व्यवस्था चालू केली, तसेच भारतात वर्णद्वेष चालू केला. त्यामुळे हिंदुंनी पक्ष आणि जाती यांमध्ये न अडकता भारतीय म्हणून संघटित झाले पाहिजे. हिंदूंनी धर्माविषयी चर्चा करायला हवी, असे प्रतिपादन अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांनी आळंदी येथे आयोजित केलेल्या वारकरी महाअधिवेशनात केले.

आळंदी येथे देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा येथे श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भव्य राज्यव्यापी 16 वे वारकरी महाअधिवेशन’ भावपूर्ण वातावरणात पार पडले. या अधिवेशनात महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा आणि लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात यावा,गड आणि दुर्ग यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवावी अशी वारकऱ्यांनी एकमुखी मागणी केली.

अधिवेशनात अनेक ठराव मंजूर

सर्व तीर्थक्षेत्री मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घालावी, पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रांयणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, सर्व मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करावीत, बियरबार, मटण दुकानांना देवता आणि गडकोटांची नावे देऊ नयेत, महाराष्ट्रात गोसंवर्धन आयोगाची स्थापना करण्यात यावी, हलाल शिक्का असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा, यांसह 16 ठराव संमत करण्यात आले.महाअधिवेशनात झालेल्या ठरावांचे निवेदन तयार करून वारकर्‍यांच्या वतीने ते मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

या अधिवेशनात बोलतांना ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले की, हिंदूंवरील आघातांच्या विरोधात हिंदू जागृत झाला पाहिजे, गोहत्या बंदी कायदा झालाच पाहिजे. गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहून हिंदूंनी स्वतःची ताकद दाखवून दिली पाहिजे. द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर म्हणाले की, कीर्तनकारांनी संप्रदायाची आचारसंहिता बाळगून कीर्तनातून धर्माचे ज्ञान दिले पाहिजे.

शालेय अभ्यासक्रमात संत आणि धर्मशास्त्र अभ्यासक्रमाचा समावेश केला पाहिजे. योगीदत्तनाथ महाराज म्हणाले की, कीर्तनकारांनी हिंदू देवता, धर्म आणि वाङमय यांचे शिक्षण देऊन हिंदुंना जागृत करावे. हिंदू देवतांचे विडंबन आणि टीका करणार्‍यांना कडाडून विरोध करावा. कीर्तनातून कीर्तनकरांनी हिंदू धर्म आणि हिंदू यांच्यावर होणार्‍या अत्याचारांची माहिती दिली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...