आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानव्या वर्षात स्वस्तात घर घेण्याचे पुणेकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पुण्यात म्हाडा कडून नव्या वर्षात तब्बल ५ हजार ९८० घरांची सोडत काढली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सोडत नव्या संगणक प्रणालीनुसार काढण्यात येणार आहे. या सोडतीमुळे पुण्यात घर घेण्याचे अनेक सामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे, अशी माहिती पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी बुधवारी दिली आहे.
ही सोडत आयएलएमएस २.० या संगणक प्रणालीच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे. या पूर्वी केवळ ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा होती आणि त्यानंतर विजेत्यांची प्रतीक्षा यादी जाहीर होत असे. तसेच कागदपत्रांची पूर्तता, छाननी आदी प्रक्रिया पार पाडली जात होती. आता नवीन आयएलएमएस २.० प्रणालीमुळे ही सर्व प्रक्रिया अर्ज भरण्यावेळीच घरबसल्या पूर्ण करावी लागणार आहे. पुणे म्हाडा विभागांतर्गत प्रथमच केवळ पुणे जिल्ह्यांतर्गत सोडतीमध्ये साडेचार हजारांहून अधिक सदनिकांचा समावेश आहे. त्यामध्ये म्हाडाच्या विविध योजनेतील २५९४, सर्वसमावेशक योजनेंतर्गत (२० टक्के) २९९० आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३९६ अशा एकूण ५ हजार ९८० सदनिकांचा समावेश आहे, अशी माहिती माने-पाटील यांनी दिली. म्हाडाने या वर्षी दोन सोडती काढल्या होत्या. यामुळे अनेकांची पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या सोडतीमुळे देखील स्वस्तात नागरिकांना घर घेता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सोडतीत सहभाग घ्यावा आणि आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन माने पाटील यांनी केले आहे.
साेडतीमध्ये असेल संपूर्ण पारदर्शकता म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या सदनिकांची विक्री करण्यासाठी म्हाडाने आपल्या संगणकीय सोडत प्रणालीत महत्वपूर्ण बदल केले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही सोडत प्रक्रिया आता पूर्णपणे मानवी हस्तक्षेपविरहीत करण्यात आली आहे. त्यामुळे सोडत आज्ञावली अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षित झाली आहे. सदनिकेसाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आली आहे.
डिजिटल स्वरूपात आलेल्या माहितीचे जतन म्हाडाच्या राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीकरिता ILMS 2.0 (Integrated Lottery Management System) ही नूतन संगणकीय सोडत प्रणाली तयार करण्यात आली आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानानेे ही प्रक्रिया हाताळली जाईल. यामध्ये नागरिकांनी डीजिटल स्वरूपात सादर केलेली माहिती व कागदपत्रे जतन होतील. या माहितीत कोणी जाणीवपूर्वक हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास सहज लक्षात येऊ शकेल. ब्लॉकचेन प्रणाली दर दहा मिनिटांनी अपडेट हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.