आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • There Will Be Good Rains In 33 Per Cent Drought prone Areas Of Maharashtra This Year, Said Senior Meteorologist Dr. Information Of Ramchandra Sable

आनंदवार्ता:राज्यातील 33 टक्के दुष्काळी भागात यंदा चांगला पाऊस; मराठवाड्यातील परभणी, जालना येथे 100 टक्के बरसणार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीच्या १०१ टक्के पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत वर्तवला. तसेच महाराष्ट्रातील एकूण ३३ टक्के दुष्काळी भागात यंदा चांगला पाऊस होणार असल्याचेही डॉ. साबळे म्हणाले.

यंदाचा पावसाचा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर आधारित आहे. या वर्षी वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून महिन्यात पावसात खंड राहू शकतो. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. जून महिन्यात तापमान, हवेच्या दाबामुळे पाऊस कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये. घाई केली तर दुबार पेरण्या करण्याची वेळ येऊ शकते.

असे राहील पावसाचे प्रमाण
जून ते सप्टेंबरमध्ये पश्चिम विदर्भातील अकोल्यात १०० टक्के पाऊस होईल. विदर्भातील नागपुरात १०० टक्के व यवतमाळमध्ये १०२ टक्के पाऊस होईल. चंद्रपुरात १०३ टक्के पाऊस होईल. मराठवाड्यातील परभणी, जालना १०० टक्के, कोकण विभागातील दापोलीत १०० टक्के, उत्तर महाराष्ट्रातील निफाड १०० टक्के, धुळे १०२ टक्के, जळगाव १०० टक्के, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर १०२ टक्के, कोल्हापूर, कराड, पाडेगाव, राहुरी, पुणे मिळून १००.३ टक्के पाऊस होईल, असे डॉ. साबळे यांनी नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...