आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाण्याची कॅन घेण्याचा बहाणा करत दोन तरुणांनी घरात जबरदस्तीने प्रवेश करून तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने दोघांना प्रतिकार केला असता त्यांनी तिला सिगारेटचे चटके देत नंतर लोखंडी झाऱ्यानेही चटके दिल्याचा प्रकार हिंजवडी येथे उघडकीस आला. ही तरुणी पंधरा दिवसांपूर्वीच अकाेला येथून पुण्यात नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी आली आहे.
याप्रकरणी १८ वर्षीय पीडित तरुणीने हिंजवडी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली अाहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असूून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पीडित तरुणी ही रविवारी घरी होती. या वेळी २४ ते २५ वयाेगटातील दाेन अनाेळखी तरुण तिच्या घरी आले. त्यांनी तिला घरातील पाण्याची कॅन घ्यायची आहे, असे सांगत घरात प्रवेश केला. यातील एकाने पीडितेला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला प्रतिकार करत घरातील झारा फेकून मारला. आरोपीने त्याच्या दुसऱ्या साथीदाराला बोलावून घेतले. दोघांनीही तिला पकडून तिच्यावर जबरदस्ती करण्याच्या प्रयत्न केला. विरोध केल्यास थेट जाळूून टाकण्याची धमकी देत दुसऱ्या आरोपीने त्याच्या हातातील सिगरेटचे चटके पीडितेला दिले. त्यानंतर त्यांनी झाऱ्या गॅसवर गरम करून तरुणीच्या डाव्या हाताच्या दंडावर चटका दिला. पहिल्या मुलाने तिच्याशी शारीरिक जवळीक साधली. या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने आरडाओरडा केल्याने आरोपी तेथून पसार झाले.
तरुणीचा दुसराच बनाव
तरुणीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना समजल्यास बदनामी होईल या भीतीने तिने दुसराच बनाव करून तक्रार दिली. त्यानुसार तिने पोलिसांना सांगितले की, फर्ग्युसन कॉलेजला जाण्यासाठी रिक्षात बसले त्या वेळी एका तरुणाने सदर कृत्य केल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी तिचा बनाव ओळखला. त्यानंतर तिने पोलिसांना सत्य सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.